शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : कोरोनाची लस सकाळच्या तुलनेत दुपारी घेणे जास्त प्रभावी, संशोधनातून दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 15:35 IST

Corona Vaccine : कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. याच लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधनातून तज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे. 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतासह जगभरात ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आतापर्यंत 57 देशांमध्ये आढळलेले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. याच लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधनातून तज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे. 

कोरोनाची लस सकाळच्या तुलनेत दुपारी घेतल्यास जास्त प्रभावी असल्याचे म्हटले आहे. तसेच, दुपारी अँटीबॉडीचे प्रमाण जास्त असते. जर्नल ऑफ बायोलॉजिकल रिदममध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, 24 तासांत शरीरातील अनेक घटनाक्रम बदलत असतात, ज्यात संसर्गजन्य रोग आणि लसीकरणाची प्रक्रियेचा सुद्धा समावेश आहे.

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल (MGH) मधील सह-वरिष्ठ लेखिका एलिझाबेथ क्लेरमन म्हणाल्या, "एका संशोधनात असे आढळून आले आहे की,  सकाळच्या तुलनेत दिवसा SARS-CoV-2 लसीकरणाच्या प्रति प्रतिकारशक्तीला अधिक प्रभावित करते." संशोधकांचे म्हणणे आहे की, काही रोगांची लक्षणे आणि अनेक औषधांचा परिणाम दिवसा अधिक प्रभावी असतो. तसेच, फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये अनेकदा लक्षणे अधिक असतात, त्यांच्यावर औषधांचा प्रभाव दुपारी अधिक असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. 

2,190 आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी संशोधकांच्या म्हणण्यानुसार, इन्फ्लूएंझा लसीकरण घेतलेल्या वृद्ध पुरुषांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेव्हा त्यांना दुपारी लसीकरण करण्यात आले, तेव्हा त्यांच्यात उच्च अँटीबॉडीची कमतरता होती. युनायटेड किंगडममध्ये हे संशोधन 2,190 आरोग्य कर्मचाऱ्यांवर SARS-CoV-2 लसीकरणाची चाचणी करण्यात आली, यावेळी सकाळच्या तुलनेत दुपारी दिलेल्या डोसमध्ये अँटीबॉडीज जास्त तयार झाल्याचे दिसून आले. 

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढली चिंता!कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरात ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी सांगितले की, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आतापर्यंत 57 देशांमध्ये नोंदविले आहेत. तसेच, झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतातही परिस्थिती चिंताजनक!भारतासह जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. भारतातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा 20 च्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य