शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 14:32 IST

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही.

न्यू यॉर्क-  विकसनशील देश असो वा विकसित देश मधुमेह सर्वच देशांतील लोकांमध्ये झपाट्याने पसरत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेमध्ये प्रत्येक ७ लोकांपैकी एका व्यक्तीस मधुमेह असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. तसेच यापैकी अनेकांना आपल्याला मधुमेह आहे याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब तज्ज्ञांनी उघड केली आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. मधुमेह अमेरिकेतील एक स्थायी आजार झाला असून ३ कोटी लोकांना मधुमेह झाला आहे अशी माहिती या वित्रागाचे साथजन्य आजारतज्ज्ञ मार्क एबेरहार्ट यांनी दिली. वय वाढलेल्या लोकांना मधुमेह होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रौढ, वृद्धत्त्व हे मधुमेही लोकांची संख्या जास्त होण्याचे एक कारण आहे असे ते सांगतात. तसेच लठ्ठपणामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे मार्क सांगतात. ज्या लोकांना आपल्याला मधुमेह नाही असे वाटते त्यांनीही मधुमेहासाठी रक्ततपासणी केली पाहिजे, कारण मधुमेह नाही असे वाटणाऱ्या प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे तपासणीतून सिद्ध झाले आहे असे मार्क एबेरहार्ट सांगतात.

अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ९५ टक्के मधुमेहींना टाइप टू डायबेटिस झाला आहे. हा मधुमेह साधारणपणे (नेहमी नव्हे) लठ्ठपणा आणि वजनवृद्धीशी संबंधित असतो. तर ५ टक्के रुग्णांना टाइप वन डायबेटिस आहे. हा मधुमेह अगदी कमी वयात होतो आणि तो जीवनशैलीशी संबंधित नसतो. तसेच या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अमेरिकेतील १६ टक्के पुरुषांना तसेच १२ टक्के महिलांना मधुमेह आहे. वंशांनुसार मधुमेहाचा विचार केल्यास हिस्पॅनिक वंशाच्या २० टक्के लोकांना, कृष्णवंशियांमध्ये १८ टक्के तर श्वेतवर्णियांमध्ये १२ टक्के लोकांना मधुमेह आहे. सामान्य पातळीपेक्षा वजन जास्त असणे आणि लठ्ठपणा हे मधुमेहाचे मुख्य कारण बनत चालल्याचेही या संशोधकांना लक्षात आले. सामान्य पातळीइतके किंवा त्यापेक्षा कमी वजन असणाऱ्या लोकांपैकी केवळ ६ टक्के लोकांना मधुमेह होता. वजन अधिक असणाऱ्या लोकांमध्ये ते प्रमाण १२ टक्के इतके होते. तर लठ्ठ (ओबेस) लोकांमध्ये ते प्रमाण २१ टक्के इतके होते. मधुमेह झाल्यानंतर त्यावर उपचार उपलब्ध असले तरी लोकांनी मधुमेह होऊच नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे एबरहार्ट यांचे मत आहे. आजार रोखणे हीच कधीकधी योग्य उपचारपद्धती असते असे ते म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेहUSअमेरिका