शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वेळी-अवेळी येणाऱ्या जांभईचं रहस्य काय?; जाणून घ्या झोपेशी संबंध असलेल्या जांभईबद्दल रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 08:21 IST

आपण थकलेलो असलो, बोअर झालेलो असलो किंवा  झोप अनावर झाली की, आपल्याला जांभई येते. विशेषत: सकाळी झोपेतून उठल्यावर; झोप पूर्ण झालेली नसल्यास किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला जांभया येतात.

आपण थकलेलो असलो, बोअर झालेलो असलो किंवा  झोप अनावर झाली की, आपल्याला जांभई येते. विशेषत: सकाळी झोपेतून उठल्यावर; झोप पूर्ण झालेली नसल्यास किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला जांभया येतात. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते ज्येष्ठ व्यक्तिपर्यंत साऱ्यांनाच जांभई येते. प्राणीही याला अपवाद नाहीत, पण झोप आणि जांभई केवळ यापुरताच हा संबंध मर्यादित नाही. 

आपल्याला जांभई का येते, यासंदर्भात शास्त्रज्ञांनी केेलेलं संशोधन अतिशय महत्वाचं आहे. त्यांच्या मते जेव्हा आपल्याला झोप आलेली असते, कंटाळा आलेला असतो, अशा वेळी आपल्या मेंदूला जागृत, रिलॅक्स करण्याचं काम जांभई करते. 

काही शास्त्रज्ञांच्या मते, जांभई ही आपल्यासोबतच्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. जांभई आल्यामुळे त्यांना कळतं की या व्यक्तीला आता झोप आली आहे, तो बोअर झाला आहे किंवा त्याला कसला तरी ताण आला आहे. ज्यावेळी आपण चिंताग्रस्त स्थितीत असतो, त्यावेळीही आपल्याला जांभया येण्याचं प्रमाण वाढतं. जांभई देण्यातून आपण एकप्रकारे मेंदूला शांत, रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्हाला जर दिवसाही खूप मोठ्या प्रमाणात जांभया येत असतील, तर तुमची झोप व्यवस्थित झालेली नाही किंवा तुम्हाला झोपेची समस्या आहे, हे सिद्ध होतं. 

जांभया प्रत्येकालाच येतात, सर्वसामान्य व्यक्ती दिवसभरातून २८ वेळा जांभई देऊ शकते, पण दर १५ मिनिटात तुम्ही तीन किंवा चार जांभया देत असाल, तर ते शास्त्रीयदृष्ट्या ॲबनॉर्मल समजलं जातं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं श्रेयस्कर ठरतं.

जांभई संसर्गजन्य समजली जाते. तुम्ही स्वत:ही याचा कित्येकदा अनुभव घेतला असेल.  शेजारच्याला जांभई आली, तर आपल्यालाही जांभई येते. इतकंच काय, एखादा चित्रपट पाहात असताना त्यातील पात्रानं जांभई दिली, पुस्तक वाचत असताना जांभईचा उल्लेख आला, अगदी मनात तसा विचार आला, तरी आपल्याला जांभई येते. जांभई देणारी व्यक्ती जर आपल्या जवळची असेल, तर आपल्यालाही जांभई येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. जांभई देऊन त्या व्यक्तीला आपणही एक प्रकारे सहानुभूती दाखवत असतो. त्यामुळे संसर्गजन्य जांभई म्हणजे एक प्रकारे प्रेमाचं प्रतीकही आहे, असं म्हणतात!

टॅग्स :Healthआरोग्य