शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांखालील तरुणांमध्येही वाढतोय पार्किन्सनचा धोका; भारतात १२ लाख रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:48 IST

Nagpur : जगात सुमारे १ कोटी २० लाख तर भारतात १२ लाखाच्यावर लोक पार्किन्सन या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार प्रामुख्याने ६५ वर्षावरील व्यक्तींमध्ये दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात सुमारे १ कोटी २० लाख तर भारतात १२ लाखाच्यावर लोक पार्किन्सन या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार प्रामुख्याने ६५ वर्षावरील व्यक्तींमध्ये दिसतो; मात्र, आता ४० वर्षांखालील तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. ११ एप्रिल हा दिवस 'जागतिक पार्किन्सन दिन' म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने शुक्रवारी त्यांनी ही माहिती दिली.

आधुनिक उपचारपद्धती आणि आशेचा किरण

लंडनमधील मूव्हमेंट डिसऑर्डर तज्ज्ञ डॉ. कैलाश भाटिया यांच्या मते, वैद्यकीय क्षेत्र अशा टप्प्यावर आहे जिथे नवीन औषधांमुळे आजाराचा वेग मंदावणे शक्य झाले आहे. मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. धृव बत्रा यांनी स्पष्ट केले की, हा आजार पूर्ण बरा होत नसला तरी योग्य औषधोपचारांनी रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.औषधांचा परिणाम कमी झाल्यास 'डीप ब्रेन स्टिम्युलेशन'सारखी शस्त्रक्रिया वरदान ठरू शकते. रुग्णांनी 'स्टेम सेल थेरपी'सारख्या प्रयोगांपासून दूर राहावे.

सुरुवात पोटापासून

पार्किन्सनची सुरुवात पोटापासून होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा आणि साखर, फास्ट फूड टाळावे. नियमित व्यायाम करावा.

२५ टक्के निदान चुकीचे

पार्किन्सन हा मेंदूचा विकार असून, यात शरीराच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही. हाता-पायांना कंप सुटणे, हालचालीत संथपणा, स्नायू कडक होणे, चालताना तोल जाणे, बोलण्यात बदल होणे ही लक्षणे आहेत. या आजाराचे निदान प्रामुख्याने वैद्यकीय तपासणीतून होते; यासाठी अनेकदा एमआरआयचीही गरज भासत नाही. सुरुवातीची लक्षणे न ओळखली गेल्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होत डॉ. मेश्राम म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Parkinson's Risk Rises Among Young Adults; India Reports 1.2 Million Cases

Web Summary : Parkinson's, typically affecting those over 65, is increasingly seen in younger adults. India has over 1.2 million cases. Early diagnosis is crucial, though often missed. Modern treatments, including medication and deep brain stimulation, offer hope for managing symptoms and improving quality of life. Diet and exercise are also important.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य