शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काचबिंदू गंभीरपणे घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:50 IST

दरवर्षी १० मार्च ते १६ मार्च काचबिंदू सप्ताह पाळून अंधत्व आणणाऱ्या आजाराबाबत जनजागृती केली जाते. आज या सप्ताहाची समाप्ती होत आहे, त्यानिमित्त..

डॉ. तात्याराव लहाने, वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ -काचबिंदू (ग्लुकोमा) हा डोळ्यांचा एक गंभीर आजार आहे. या आजारात डोळ्यातील अंतस्राव बाहेर जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. पाणी आतच साठून राहिल्याने डोळ्याचा दाब  वाढतो. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होऊन हळूहळू अंधत्व येऊ शकते. 

भारतामध्ये दरवर्षी या आजाराचे १ कोटी २० लाखांहून जास्त रुग्ण आढळतात. महाराष्ट्रातील अचूक रुग्णसंख्या उपलब्ध नसली तरी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्ररुग्णालयीन अभ्यासानुसार राज्यात काचबिंदू होण्याचे प्रमाण ७.२ टक्के (४० वर्षांपूर्वी ५ टक्के आणि ४० वर्षांनंतर १० टक्के) इतके आहे.

ठाणे जिल्ह्यातील एका अहवालानुसार, महाराष्ट्रात काचबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण २.०६ टक्के इतके आहे. ते देशातील १.९९ टक्के प्रमाणापेक्षा थोडे जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये काचबिंदूचे साधारणतः ८० लाख  रुग्ण आहेत.त्यातील २५ लाख रुग्ण संपूर्ण अंध किंवा त्यांची दृष्टी ३/६० पेक्षा कमी असू शकते. तसेच एका अहवालानुसार, फक्त सोलापूर शहरातच २० हजारपेक्षा अधिक काचबिंदूचे रुग्ण असल्याची नोंद आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात काचबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण १२ टक्के आहे आणि महाराष्ट्रातही हे प्रमाण तुलनात्मक आहे. हळूहळू या आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या वाढ हाेत आहे. हा आजार हाेण्याचे वयही अलिकडे आले आहे. यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या आजाराविषयी गांभिर्याने घेतले पाहिजे.

काचबिंदूचे निदान या आजाराची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तसेच पूर्वी कुटुंबातील कुणाला काचबिंदूचा आजार झाला असल्यास त्याचबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी नियमित नेत्रतपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चाचण्या कोणत्या? १. नेत्रदाब तपासणी – डोळ्यांचा दाब मोजला जातो. २. ऑप्टिक नर्व्ह तपासणी – डोळ्यांच्या नसांची हानी झाली आहे का, ते पाहिले जाते. ३. दृष्टिक्षेत्र चाचणी  – डोळ्यांची परिघीय दृष्टी कमी झाली आहे का, हे तपासले जाते. ४. कॉर्नियल (बुबुळाची) जाडी चाचणी  – कॉर्निया किती जाड किंवा पातळ आहे, हे तपासले जाते. ५. गोनियोस्कोपी  – डोळ्यांच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये अडथळा आहे का, हे पाहण्यासाठी ही चाचणी केली जाते.

काचबिंदूचे मुख्य प्रकार आणि  लक्षणे १. ओपन अँगल ग्लुकोमा (सर्वसामान्य प्रकार) सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.हळूहळू परिघीय दृष्टी कमी होते. उशिरा लक्षात आल्यास मध्यभागीही दृष्टी गमावली जाऊ शकते. २. अँगल-क्लोजर ग्लुकोमा (अचानक उद्भवणारा प्रकार) डोळ्यांत तीव्र वेदना आणि दडपण जाणवते. डोळे लाल होतात. डोळ्यांसमोर धूसर किंवा प्रकाशाभोवती इंद्रधनुष्याचे वलय दिसते. डोकेदुखी आणि मळमळ. ३. जन्मजात काचबिंदू (लहान मुलांमध्ये) डोळे मोठे आणि फुगलेले दिसतात. सतत पाणी येते आणि प्रकाश सहन होत नाही.दृष्टी अस्पष्ट, अपूर्ण राहते.

काचबिंदूच्या उपचारातील प्रगती : १. मायक्रो-इनव्हेसिव्ह ग्लुकोमा सर्जरी पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी आक्रमक असलेल्या  तंत्रांच्या मदतीने डोळ्यांच्या दाबाचे नियंत्रण अधिक सुरक्षित आणि जलद पुनर्प्राप्तीसह केले जाते. २. नवीन औषधोपचार : नेत्रदाब कमी करण्यासाठी नवीन औषधे आणि डोळ्यांचे थेंब विकसित केले गेले आहेत, ज्यामुळे रुग्णांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ३. लेझर थेरपीतील सुधारणा: सेलेक्टिव्ह लेझर ट्रॅबेक्युलोप्लास्टीसारख्या तंत्राच्या मदतीने नेत्रदाब नियंत्रित करण्यासाठी अधिक अचूक आणि कमी जोखीम असलेले उपचार उपलब्ध झाले आहेत.  

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर