शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच दिसतात डायबिटीसही लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:31 IST

Symptoms of diabetes in Morning : डायबिटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. टाइप 2 डायबिटीस 40 वयानंतर अधिक होतो. हा आजार किडनी आणि हृदयरोगाचं एक मोठं कारण आहे.

Symptoms of diabetes in Morning : भारतात गेल्या काही वर्षात डायबिटीसच्या रूग्णांची संख्या खूप जास्त वाढली आहे. डायबिटीसचा आजार एकप्रकारची एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ज्यात शरीरात पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा त्याच्या योग्यपणे वापर होण्यास अडचण येते. अशात शरीरात इन्सुलिनची कमतरता झाली की, शुगरचं प्रमाण वाढू लागतं. ज्यामुळे किडनी, हृदय, डोळे आणि एकूणच आरोग्य प्रभावित होतं. 

डायबिटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. टाइप 2 डायबिटीस 40 वयानंतर अधिक होतो. हा आजार किडनी आणि हृदयरोगाचं एक मोठं कारण आहे.मुळात आपलं लिव्हर आपलं शरीर दिवसासाठी तयार करण्यासाठी आणि त्याला अधिक सक्रीय करण्यासाठी ब्लड शुगर रिलीज करतं. हेच कारण आहे की, डायबिटीसने पीडित लोकांना सकाळी हाय ब्लड शुगर जाणवतं. ज्यात घशात आणि तोंडात कोरडेपणा, रात्री पुन्हा पुन्हा लघवी करूनही लघवीची पिशवी भरलेली राहणं, दृष्टी कमजोर होणे आणि भूक यासारखी लक्षण दिसतात.

नेक लोकांना डायबिटीसची माहिती मिळण्याआधीच थकवा, झोप येणे, दृष्टी कमजोर होणे, फंगल इन्फेक्शन आणि फोडं अशी लक्षण दिसू शकतात. अशात व्यक्तीला शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आणि आजार वाढण्याआधीच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.

सकाळी दिसणारी लक्षण 

डॉक्टर सांगतात की, असं नाहीये की, सकाळी दिसणारी लक्षण दिवसा दिसणार नाहीत. खाज, थकवा, कमजोरी, ज्यात भूक लागणं, जास्त तहान लागणं ही लक्षण रात्री दिवस दोन्हीवेळ दिसू शकतात. वजन कमी होणे,  जखमा लवकर बऱ्या न होणं, प्रायव्हेट पार्टमध्ये खाज अशी लक्षणं तुम्हाला दिवसभर दिसू शकतात.

डायबिटीसची इतर लक्षण 

जास्त भूक लागे, अचानक वजन कमी होणे, हात आणि पायात झिणझिण्या, थकवा, कमजोरी,  त्वचा कोरडी, जखमा लवकर न भरणे, जास्त तहान लागणे, खासकरून रात्री जास्त लघवी लागणे, इन्फेक्शन, केसगळती ही टाइप 2 डायबिटीसची लक्षण आहेत. तेच टाइप 1 डायबिटीसमध्ये मळमळ, पोटदुखी,  उलटीसारखी लक्षण दिसतात.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स