शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

उन्हाळा सुरू होताच फ्रीजचे थंड पाणी पिताय ? वेळीच सावध व्हा, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:27 IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते.

Summer Health Tips : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरून आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. घरात बसून रहावं आणि सतत गारेगार पाणी प्याव असं प्रत्येकाला वाटतं. जोपर्यंत थंड पाण्याचा एक घोट घशामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आराम मिळत नाही. जरी थंड पाणी पिल्याने तहान भागते; परंतु जास्त थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त थंड पाणी तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते. उन्हाळ्यात लोकांनी जास्त पाणी प्यावे; परंतु ते पाणी कसे आणि कोणते पित आहोत याची खबरदारी घ्यावी.

मायग्रेन ट्रिगर करू शकते : अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. तसेच मायग्रेनची समस्या वाढू शकते. जर तुम्ही आधीच मायग्रेनचे बळी असाल तर थंड पाण्यामुळे आणखी त्रास जाणवू शकतो.

थंड पाण्यामुळे शरीराच्या इतर अवयवांचं देखील नुकसान होतं. थंड पाणी पिल्याने नाकातील श्लेष्मल त्वचा कडक होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. सर्दी किंवा फ्लूची समस्या असल्यास थंड पाणी पिणे टाळा. त्यामुळे थंडीशी संबंधित समस्या उद्भवू शकते.

पाण्याची कमतरता : उन्हातून फिरून आल्यानंतर पहिले थंड पाण्याची गरज भासते; पण तुम्हाला माहीत आहे का ? हेच थंड पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते आणि हायड्रेशनसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात; मात्र उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

लठ्ठपणा वाढतो : थंड पाणी तुमच्या शरीरात साठलेली चरबी आणखी घट्ट करते. यामुळेच वजन कमी करण्यात अडचण येते. नेहमी थंड पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे वजन कमी करताना कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पचनक्रिया समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिल्यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. कारण अन्न खाताना अतिशय थंड पाणी प्यायल्याने अन्न पचण्याऐवजी शरीर त्या ऊर्जेचा वापर पाण्याचे तापमान सामान्य करण्यासाठी करते. त्यामुळे जेवताना जास्त थंड पाणी पिऊ नये असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम : उन्हाळा असला तरी नेहमी सामान्य पाणी पिण्याची सवय लावा. तसेच कोमट पाणी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं. कोमट पाणी पिणे हा तुमच्यासाठी पचन, रक्ताभिसरण आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. कोमट पाणी प्यायल्याने तहान कमी लागते. म्हणूनच उन्हाळ्यात सामान्य पाणी पिण्याची सवय लावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स