शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांच्या वायूवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण

By स्नेहा मोरे | Updated: September 13, 2022 20:13 IST

काकीने केला यकृताचा काही भाग दान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सहा दिवसांच्या वायू विसावदिया या बाळाला जन्मतःच पित्तनलिका नसल्याचे निदान झाले. त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या या बाळावर आतडे यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु ही शस्त्रक्रिया अयशश्वी झाल्याने बाळाला यकृताचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. त्यानंतर या चिमुरड्याचा जीव वाचविण्यासाठी नऊ महिन्यांच्या या बाळाला त्याच्या काकीने यकृताचा काही भाग देऊन नवा जन्म दिला आहे.

यकृत निकामी होण्याच्या स्थितीत असलेल्या वायूकडे यकृत रोपणाचा पर्याय होता . वायूचे आई- वडिल यकृत दान करण्यास योग्य नसल्यामुळे त्याची काकी विधी विसावदिया ज्यांचे एकच महिन्यापूर्वीच लग्न झाले होते त्यांनी स्वेच्छेने त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्याचे मान्य केले. विधी यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता तर वायूचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह होता.

नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रियेत सहभागी असलेले पेडिअॅट्रिक हेपटोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीतज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले, पश्चिम भारतात प्रथमच ह्यावेळी डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला व त्यानंतर एका नऊ महिन्यांच्या बालकाची यशस्वी एबीओआय यकृतारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. 18 ऑगस्ट रोजी वायूची जिवंत दात्याने दिलेल्या यकृताच्या रोपणाची यशस्वी एबीओआय  शस्त्रक्रिया करण्यात आली. वायूच्या वैद्यकीय स्थितीमुळे त्याची रोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती.

शस्त्रक्रियेस सहा तासांपेक्षा अधिक वेळ - डॉ. अनुराग श्रीमाल, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियातज्ज्ञ

बाळाच्या स्वादुपिंडाच्या खाली असलेल्या प्लिहेच्या शीरेपर्यंत आणि सुपिरियर मेसेन्टेरिक व्हेन (एसएमव्ही) पर्यंत पोहोचलो. त्यानंतर सांध्यातून रोपण केलेल्या यकृताला प्रवाह उपलब्ध करून दिला . अशा प्रकारे अॅट्रेटिक पोर्टल व्हेनला बायपास केले. शस्त्रक्रियेच्या सहा तास 30 मिनिटांच्या कालावधीत प्रत्येक स्थिती उत्तम प्रकारे हाताळण्यात आली. वायूने उपचारांना अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि दहा दिवसांच्या आत त्याला डिस्चार्ज देता येईल इतकी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMumbaiमुंबई