शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे 'हा' उपाय, वैज्ञानिकांनीही यावर केलं शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:50 IST

How To Reduce Cholesterol: कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असतो जो आपल्या नसांमध्ये जमा होतो. याचं प्रमाण वाढलं तर ब्लड फ्लो कमी होतो आणि तुम्हाला हार्ट डिजीज, स्ट्रोक, हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

How To Reduce Cholesterol: हार्ट डिजीजमुळे जगभरात लोक शेकडो लोकांचा जीव जातो. हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि सूज यांसारख्या समस्यांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. NCBI मध्ये प्रकाशित एका  रिसर्चनुसार, तुमच्या किचनमध्ये असलेला लसूण कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करून तुम्हाला हार्ट डिजीजपासून वाचवू शकतो.

रिसर्चमधून समोर आलं की, लसणासोबत लिंबाचं सेवन केलं तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळू शकते. लसणातील इम्यून बूस्टिंग, एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट गुणांमुळे याचे हृदयाला फायदे मिळतात. कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असतो जो आपल्या नसांमध्ये जमा होतो. याचं प्रमाण वाढलं तर ब्लड फ्लो कमी होतो आणि तुम्हाला हार्ट डिजीज, स्ट्रोक, हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

लसूण आणि लिंबात आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद

अभ्यासकांनी सांगितलं की, लसणामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. लसूण आणि लिंबाच्या रसाचं सोबत सेवन केलं तर हाइपरलिपिडिमियाच्या रूग्णांच्या लिपिड लेवल, फाइब्रिनोजेन आणि ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा होते. रिसर्चमधून समोर आलं की, दररोज लसणाची अर्धी किवा एक कळी खाल्ली तर कोलेस्ट्रॉल लेव्हल जवळपास 10 टक्के कमी होतं.

लसणाने हृदय कसं निरोगी राहतं

लसूण आपल्या बायोअॅक्टिव गूण एलिसिन आणि इतर घटक जसे की, डायलिल डायसल्फाइड आणि एस-एलसिस्सीस्टीनमुळे शक्तीशाली जडीबुटी आहे. अभ्यासक असं मानतात की, लसणातील पोषक तत्व हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.

अॅंटी-ऑक्सिडेंटचा खजिना लसूण-लिंबू

यात व्हिटॅमिन सी असतं जे एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. याने हृदयाचं फ्री रॅंडिकलपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. व्हिटॅमिन बी6 हेल्दी रेड सेल्स वाढवण्यास मदत करतं आणि हार्ट डिजीजचा धोकाही कमी होतो.

कसं करावं लसणाचं सेवन

लसणाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. तुम्ही लसणाचं सेवन कोणत्याही रूपात करा. याने कोलेस्ट्रॉल आणि कमी घनत्व असलेले लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. अभ्यासकांनी लसूण आणि लिंबाचं सोबत सेवन करण्यास सांगितलं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग