स्टोन मसाज थेरपीने वेदनांना करा बाय बाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 15:49 IST
आज सौंदर्य वाढविणे तसेच विविध आजारांवर उपचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी प्रचलित होत आहेत. त्यापैकीच स्टोन मसाज थेरपी असून, त्यात मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन आपल्या सौंदर्यात भर पाडता येते.
स्टोन मसाज थेरपीने वेदनांना करा बाय बाय !
आज सौंदर्य वाढविणे तसेच विविध आजारांवर उपचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी प्रचलित होत आहेत. त्यापैकीच स्टोन मसाज थेरपी असून, त्यात मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. शिवाय शारीरिक वेदनांपासून मुक्तता मिळू शकते. स्टोन मसाज थेरपी ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये नदीत आढळणाऱ्या दगडांचा वापर करुन मसाज केला जातो. या थेरपीमुळे त्वचेची कांती उजळण्यासोबतच विविध व्याधींवर उपचारही केला जातो.हॉट स्टोन मसाज थेरपीमध्ये गुळगळीत दगड विशिष्ट तापमानावर गरम करुन शरीरावरील पाठ, हात आदींच्या केंद्रस्थानी ठेवले जातात. तर काही दगड हातात घेऊन थेरपिस्ट स्नायूंना मसाज करतात.याउलट चिल्ड स्टोन मसाजमध्ये गरम ऐवजी थंड संगमरवरी दगड वापरले जातात. चिल्ड मसाजसाठी बर्फाच्या लादीत दगड ठेवून थंड केले जातात. काय आहेत फायदे-या थेरपीमुळे दगडातील उष्णता शरीरात शोषून घेतली गेल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो. स्नायूंमध्ये आलेला ताठरपणा जाऊन ते लवचिक होतात. अवयवांमध्ये वेदना असतील तर त्या दूर करण्याचे काम या मसाजद्वारे केले जाते. दगडांमधील सौम्य उष्णतेमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. खराब रक्ताभिसरणामुळे स्नायूतील ताण वाढून त्यात लॅक्टीक अॅसिडची निर्मिती व्हायला लागते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने स्नायूंना मुबलक प्राणवायू पुरवठा होतो ज्यामुळे वेदना किंवा दुखणे नाहीसे होते. काय काळजी घ्याल-ही थेरपी तज्ज्ञांकडूनच करुन घ्यावी. कारण दगडाची उष्णता किंवा मसाज करताना दाब देण्याचे प्रमाण यात चूक झाली तर दुखणे बरे होण्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असते.