शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम करावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 15:17 IST

नवीन संशोधनानुसार, रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास अजून जास्त फायदे होऊ शकतात असे आढळले आहे. चला जाणून घेऊया नाश्त्याच्या आधी व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत.

व्यायाम करण्याचे अनेक  आरोग्यदायी फायदे आहेत. व्यायामाने आपले शरीर सुदृढ राहून आपण निरोगी राहतो. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांच्या संक्रमणापासून आपला बचाव होतो. अशा अनेक फायद्यांमुळेच प्रत्येक सेलिब्रिटी रोज नियमित व्यायाम करणे विसरत नाहीत. व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र एका नवीन संशोधनानुसार, रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास अजून जास्त फायदे होऊ शकतात असे आढळले आहे.नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम किंवा काम केल्यास शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही, म्हणजे वजन वाढीवर नियंत्रण येते, असे अभ्यासात म्हटले आहे.  म्हणून आपणास व्यायामाच्या आधी स्रॅक्स किंवा शेक घेण्याची सवय असेल तर ही सवय आपणास हळुहळू बदलायला हवी. चला जाणून घेऊया नाश्त्याच्या आधी व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत.  या अभ्यासात संशोधकांनी काही पुरुषांचा एक गट तयार केला आणि त्यांना उच्च कॅलरी आहार घेण्यास दिला. दररोज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी त्यांच्यातील अर्धेजण रोज व्यायाम करत होते. आश्चयार्ची गोष्ट म्हणजे, त्यांचे वजन न वाढता नियंत्रणातच होते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.  शिवाय याचा अजून एक फायदा असा आहे की, आपण नेहमी अ‍ॅक्टिव राहून दिवसभर फ्रेशदेखील वाटेल. मात्र जर आपण व्यायाम करण्याआधीच कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता करीत असाल तर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. वजन वाढल्याने अनेक समस्याही निर्माण होतात. यासाठी नाश्ता करण्यापुर्वीच व्यायाम करावा. यात आपण कार्डिओ आणि हिट प्रकारचे मध्यम ते प्रखर स्वरुपाचे व्यायाम प्रकार करु शकता. शिवाय जड वजन उचलण्याचे व्यायाम प्रकार करताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Also Read: ​FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?                  : ​Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !