शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घामाच्या वासानं लाज वाटतेय, लोकांमध्ये मिसळण्यास संकोच वाटतो मग या गोष्टी करून पाहाच!

By admin | Updated: June 30, 2017 18:09 IST

शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो.पण सोप्या उपायांनी तो घालवताही येतो.

- माधुरी पेठकरघामचा वास येतो यामुळे अनेकांना लाज वाटते.लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. आणि आपल्यापासून लोकं घामाच्या वासामुळे दूर पळतात या भावनेनं तर अपमानित व्हायला होतं. शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो. अनेकजण डिओडरन्ट वापरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा परिणाम फार कमी वेळ टिकतो. या समस्येवर उपाय कोणत्याही आर्टिफिशिअलपध्दतीनं न करता काही नैसर्गिक घटकांचा वापर करून, आहारात आणि राहाणीमानात बदल करूनही शरीराची दुर्गंधी घालवता येते.

 

हे करून बघाव्हाइट व्हिनेगर1 ) शरीराला दुर्गंधी येत असेल तर व्हाइट व्हिनेगर वापरून पाहावं. व्हाइट व्हिनेगरमध्ये कापूस बुडवावा आणि तो काखेत फिरवावा. 2) स्प्रेच्या बाटलीत व्हाइट व्हिनेगर ओतून ते स्प्रेसारखं वापरावं. आंघोळ झाल्यानंतर व्हाइट व्हिनेगरचा स्प्रे काखेत मारावा. व्हाइट व्हिनेगर वापरल्यानंतर डिओडरन्ट वापरू नये.3) एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात व्हाइट व्हिनेगर घालावं. त्या पाण्यानं काख स्वच्छ करावी.लिंबाचा रस1) लिंबामुळे दुर्गंधी निर्माण करणारे जंतू आटोक्यात राहातात. ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांना व्हिनेगर चालत नाही. पण ते लिबांचा रस वापरू शकतात. 2) लिंबू चिरून घेवून त्याचे दोन भाग करावेत. अर्धा लिबू घेवून तो दोन्ही काखेत घासावा. लिंबू घासण्याऐवजी लिंबाचा रस काढून तो कापसाच्या बोळ्यानं काखेत लावावा. रात्री झोपण्याआधी लावला तरी चालतो. 3) ज्यांना घाम जास्त येतो आणि शरीराल दुर्गंधीही जास्त येते त्यांनी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करून वापरल्यास दुर्गंधी दूर होते. बेकिंग सोड्यामुळे घाम शोषला जातो आणि जंतूही निघून जातात. यासाठी अधर््या लिंबाचा रस घेवून पेस्ट होईल इतका बेकिंग सोडा त्यात मिसळावा. आंघोळीच्या आधी ही पेस्ट काखेत लावावी. 5-10 मीनिटं ती तशीच राहू द्यावी. नंतर पाण्यानं धुवावी.

 

टी ट्री आॅइल1) टी ट्री ही अ‍ॅण्टिबॅक्टेरिअल आणि अ‍ॅण्टिसेप्टिक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या तेलामुळे बुरशी आणणाऱ्या जंतूंचा नाश होतो. या वनस्पतीला गोड वास येतो. त्यामुळे या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग डिओडरन्ट सारखाही करता येतो. 2) मात्र ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते त्यांना हे तेल लावल्यानं चुरचुरतं. म्हणून त्यांनी हे न वापरता इतर उपाय करावा. आणि ज्यांना चालतं त्यांनी दोन मोठे चमचे पाणी घ्यावं. त्यात या तेलाचे दोन थेंब मिसळावे. कापसाच्या बोळ्यानं ते पाणी काखेत लावावं. 3) ते डिओडरन्टसारखं वापरायचं असल्यास स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरावं. आणि पाण्याच्या मापानुसार तेलाचे थेंब मिसळावेत. आंघोळ झाल्यानंतर ते पाणी काखेत स्प्रे करावं.

 

गव्हाच्या तृणाचा रसगव्हाच्या तृणाचा रस चवीनं अगदीच उग्र असतो. पण हा रस नियमित सेवन केल्यानं शरीराची दुर्गंधी जाते. सुरूवात करताना थोडा थोडा तृणरस घ्यावा. एक कप पाण्यात गव्हाचा तृणरस मिसळून ते पाणी रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी घ्यावा.टोमॅटोचा रसटोमॅटोतही अ‍ॅण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. आयुर्वेदातही टोमॅटोच्या रसाचा उपयोग शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करता येतो असं म्हटलं आहे. अनेक वनौषधी तज्ञ्ज्ञांच्या मते टोमॅटोचा रस दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास शरीराला उत्तम फायदा होतो. शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी टोमॅटो वापरताना 8- 10 टोमॅटो घ्यावेत. ते सोलून त्याचा गर काढावा. गरातून रस काढून तो एक बादलीभर पाण्यात मिसळावा. आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी. शरीराला दुर्गंधी येत नाही.

 

  

 

काय खावं प्यावं आणि काय घालावं?दुर्गंधी शरीरातून येते तेव्हा केवळ बाह्य उपचार करून भागत नाही तर आपण काय खातो पितो याकडे लक्ष देवून त्याबाबतचे नियम पाळणंही गरजेचं आहे. तसेच आपण कपडे बूट कसे घालतो, शरीरस्वच्छतेच्या आपल्या सवयी काय आहेत याकडे लक्ष देवून त्यात बदल करणंही आवश्यक आहे.1 ) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंही शरीरास दुर्गंधी येत नाही. 2) आहारात प्रथिनं, कडधान्यं, तंतूमय पदार्थ, आरोग्यदायी फॅटस, ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि फळंभाज्या यांचा समावेश करावा. 3) पचण्यास अवघड पदार्थ कमी खावेत. किंवा खाऊच नये. हे पदार्थ शरीरात टॉक्सिन्स निर्माण करतात. 4) मैदायुक्त पदार्थ, रिफाइन्ड साखर खाऊ नये. प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाऊ नये. 5) अतिमसालेदार ( कांदा, लसूण) जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.6) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी चहा कॉफीचं प्रमाण आटोक्यात ठेवावं. शक्यतो चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावं.7) पुदिना, कोथिंबीर, पार्सली, ओरिगॅनो या वनस्पतींचा समावेश पदार्थात करावा. 8 ) बडीशेप चावून खावी.9) रोज आंघोळ करावी. आंघोळीचा साबण उग्र नसावा. साबण जास्त लावू नये. नैसर्गिक तत्वांचा उपयोग केलेला सौम्य साबण आंघोळीसाठी वापरावा.10) न धुतलेले कपडे वापरू नये.11) घट्ट बूट घालू नये. जास्त वेळ बूट घालू नये. बुटांऐवजी सॅण्डल्स वापराव्यात. 12) काखेतले केस नियमिपणे काढून टाकावेत. 13) राग आणि ताण नियंत्रणात ठेवावा. या दोन गोष्टींमुळेही जास्त घाम येतो आणि त्यामुळे शरीरास दुर्गंधी येते. 14) गुदमरवणारे घट्ट कपडे न वापरता सैल कपडे वापरावेत.