(Image Credit : www.medicalnewstoday.com)
स्लीप एप्निया हा एक असा आजार आहे, जो डायबिटीस, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशरसोबतच स्मरणशक्ती कमी होण्याचं कारण ठरू शकतो. झोपताना श्वास घेताना त्रास होत असल्याने ही समस्या होते. हा एक लाइफस्टाईलशी संबंधित आजार आहे, जो बरा केला जाऊ शकतो. पण एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, ज्या महिलांना स्लीप एप्निया आजार आहे. त्यांना पुरूषांच्या तुलनेत कर्करोगाचा म्हणजेच कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटीने अधिक असतो.
२० हजार लोकांवर शोध
यूरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चच्या डेटामध्ये साधारण २० हजार अशा वयस्क रूग्णांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एप्निया हा आजार आहे. यातील साधारण २ टक्के रूग्णांना कॅन्सर डायग्नोज झाला होता. स्वीडन युनिव्हर्सिटी ऑफ गोथेनबर्गचे प्राध्यापक ल्यूडगर ग्रोटे म्हणाले की, 'स्लीप एप्नियामुळे कॅन्सरचा धोका असतो. किंवा असेही म्हणता येईल की, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणं सुद्धा एक कॉमन रिस्क फॅक्टर असू शकतो जो कॅन्सर आणि स्लीप एप्नियाचा धोका वाढवू शकतो'.
पुरूषांच्या तुलनेत महिलांना अधिक धोका
अभ्यासकांनुसार, वाढत्या वयात कॅन्सरचा धोका अधिक होता, पण जर वय, जेंडर, बॉडी मास इंडेक्स, स्मोकिंग आणि अल्कोहोल सारख्या गोष्टी अॅडजस्ट करूनही कॅन्सरचा धोका आणि स्लीप एप्नियात संबंध बघायला मिळाला. आणि हा संबंध पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक बघायला मिळाला. ग्रोटे सांगतात की, 'आमच्या रिसर्चमधून हे दिसतं की, ज्यांना स्लीप एप्निया आहे, त्यांना कॅन्सरचा धोका २ ते ३ पटीने अधिक असतो'.