शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

उभं राहून पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 10:40 IST

How To Drink Water: आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक म्हटलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

How To Drink Water: तुम्ही नेहमीच घरातील वयोवृद्धांकडून ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. पण सामान्य बाब समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. कधी कुणी सांगितलेलं अचानक आठवलं तरी आपण बसून पाणी पित नाही. पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण हे उगाच सांगितलं जात नाही, त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 

उभं राहून पाणी प्यायल्याने इसोफेगसवर दबाव पडतो, पाणी वेगाने पोटात पोहोचतं. यामुळे आपल्या पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक म्हटलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

किडनीची समस्या

उभं राहून पाणी पिणं आपल्या किडनीसाठी नुकसानकारक आहे. कारण उभं राहून पाणी पिलात तर ते ब्लड सेल्सपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आणि रक्तात विषारी पदार्थ वाढतात. किडनी रक्तातील विषारी आणि अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी लघवी तयार करते. जास्त अशुद्धी असल्याने किडनीचं काम वाढतं. त्यामुळे किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

पचनक्रिया प्रभावित होते

उभं राहून पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचतं. याने ग्रासनळीत समस्या होऊ शकते. अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. बसून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम मजबूत राहते. याने पचनासंबंधी समस्या होत नाहीत.

श्वसनावर वाईट परिणाम

उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या अन्ननलिकेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या श्वासनलिकेत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही. त्यामुळे श्वसन तंत्र आणि फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. याने हार्ट प्रॉब्लेम होण्याचीही शक्यता असते.

संधीवाताची समस्या

उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्याचं प्रेशर पोटाच्याही खाली जाऊन थांबतं. ज्यामुळे हाडं आणि जॉइंट्सवर वाईट परिणाम होतो. सोबतच हाडे कमजोर होणं सुरू होतं. अशात कमजोर हाडांमुळे संधिवातसारखी समस्या होण्याचीही शक्यता असते.

बसून का प्यावं पाणी?

पाणी पिण्यासाठी बसण्याची पोजिशन सर्वात योग्य आहे. अशाप्रकारे पाणी प्यायलात तर पचन योग्यप्रकारे होतं. जेव्हा कुणी बसून पाणी पितं तेव्हा ते आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचतं. पाणी कोशिकांपर्यंत पोहोचून टॉक्सिन शरीरातून बाहेर काढतं. तसेच पाण्याचं अवशोषण चांगल्याप्रकारे झालं तर रक्तही साफ होतं. शरीर फीट राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य