शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे की पिऊ नये?; तज्ज्ञांनी केलं सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 06:38 IST

काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि चीन येथील तब्बल वीस हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं.

 तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येते? मध्ये वारंवार जाग न येता शांतपणे तुम्ही झोपू शकता? - बहुतेकांचं याबाबतीतलं उत्तर असेल, ‘नाही’. कारण अनेकांना रात्री शांतपणे झोपच लागत नाही. मग, संपूर्ण दिवस आळसावलेला जातो. उत्साही, प्रसन्न वाटत नाही. पण, ‘पाणी’ हे त्याचं कारण असू शकतं हे तुम्हाला माहीत आहे? 

पाणी आणि झोप या दोन्ही गोष्टींचा अतिशय जवळचा संबंध आहे. दिवसभरात, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही खूप पाणी पित असाल किंवा दिवसभरातलं तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी असेल, तरीही तुमच्या झोपेचे तीनतेरा वाजू शकतात. पाणी पिण्याचं प्रमाण कमी असेल, तर रात्री तहान लागल्यानं पाणी पिण्यासाठी तुम्हाला उठावं लागेल. त्यामुळे तुमची झोप चाळवेल आणि पुन्हा लगेच झोप येण्यासाठीही अडथळे येतील. त्याचप्रमाणे तुम्ही जास्त पाणी पीत असाल, तर रात्री लघवीसाठी म्हणूनही तुम्हाला वारंवार झोपेतून उठावं लागेल. याउलट तुम्हाला झाेपेची समस्या असेल, तर त्यामुळेही तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि चीन येथील तब्बल वीस हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या अभ्यासात आढळून आलं, की जे लोक रोज सहा तासांपेक्षा कमी झोपत होते, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण, जे लोक रोज आठ तास झोपत होते, त्यांच्यापेक्षा कमी होतं. आपल्या शरीरातील पाण्याचा जास्तीतजास्त निचरा मुख्यत्वे लघवीवाटे होतो, याशिवाय श्वसनावाटे आणि आपली त्वचा जे द्रवपदार्थ बाहेर फेकते, त्यामुळेही आपल्या शरीरातील पाण्याची मोठी घट होते. नुसत्या श्वसनावाटेच दिवसभरात सुमारे तीनशे ते चारशे मिलीलीटर द्रवपदार्थ बाहेर फेकला जातो. 

रात्री शांत झोप यावी यासाठी दिवसा वेळच्या वेळी पाणी पिणं, त्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवणं, कॅफिन, मद्य कमी किंवा बंद करणं, आहारात फळं आणि पालेभाज्या यांचा समावेश करणं असे उपाय नक्की करून पाहा. याशिवाय झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी पाण्याचं प्रमाण मर्यादित करा, तहान लागलीच तर घोटभरच पाणी प्या, झोपताना आपले पाय थोडे उंच असतील असं पाहा. ज्यामुळे तुमच्या पायातील पाणी शरीराकडून शोषलं जाणार नाही. चांगल्या झोपेसाठी शरीरातील पाण्याचं प्रमाणं योग्यच असलं पाहिजे.

टॅग्स :Waterपाणी