SEX KNOWLEDGE : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 19:55 IST
नव्या संशोधनानूसार महिलांनी जास्तीत जास्त सेक्स केल्याने त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
SEX KNOWLEDGE : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती !
प्रत्येक महिला-पुरुषांसाठी सेक्स ही अतिशय जिव्हाळयाची बाब आहे. दोघांच्याही जीवनात सेक्सची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आनंद तर मिळतोच, मात्र आता एका नव्या संशोधनानूसार महिलांनी जास्तीत जास्त सेक्स केल्याने त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. हा अभ्यास मॉन्ट्रियलच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमधील संधोधकांनी केला आहे. यानुसार सेक्समुळे महिलांमधील शब्द लक्षात ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते. या अभ्यासानुसार पीवीआय(पेनिस-वजायनल इंटरकोर्स) एका स्वस्थ तरूण महिलेच्या मेमरी फंक्शनला अधिक चांगलं करतो. रिसर्चनुसार महिलांमध्ये अधिक सेक्स हिप्पोकँपसमध्ये नवी टिशू तयार झाले. हिप्पोकँपस इमोशन, मेमरी आणि आॅटोनॉमिक नर्व्हस सिस्टमच सेंटर मानलं जातं. याआधी प्राण्यांवर सेक्सच्या प्रभावाचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानंतर अभ्यासकांच्या टीमने याचा प्रयोग तरूण फिमेल कॉलेज स्टूंडटवर केला. या अभ्यासासाठी १९ ते २९ वयाच्या ७८ महिलांना शब्द आणि चेहाºयावर आधारित एका कम्प्युटर मेमरी प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतलं. जर्नल आर्काईव्ह आॅफ सेक्श्युअल बिहेविअरमध्ये आलेल्या रिझल्टनुसार शब्दांना ध्यानात ठेवण्याच्या क्षमतेत सेक्सचा सकारात्मक प्रभाव झालाय.Also Read : SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा ! : SEXUAL HEALTH : सेक्स लाइफमध्ये व्हायग्रासारखे परिणामकारक आहेत हे फळ- नो साइड इफेक्ट !