शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

आता जेल टाळणार गर्भधारणा; कॉन्डम, गर्भनिरोधक गोळ्यांची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:09 PM

शरीर संबंधांदरम्यान कमी होणार स्पर्म्सचं प्रमाण

मुंबई: शरीर संबंधादरम्यान पुरुषांना कॉन्डम वापरायचं नसेल आणि महिलांना साईड इफेक्टच्या भीतीनं गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या नसतील, तर अनेकदा समस्या उद्भवतात. मात्र एका जेलच्या वापरामुळे ही समस्या सुटू शकते. शरीर संबंधादरम्यान पुरुषांना वापरता येतील, असं गर्भनिरोधक तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे. पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएचच्या युनिस केनेडी श्रिवर यांनी एका जेलची निर्मिती केली आहे. शरीर संबंधांवेळी या जेलचा वापर केल्यास पुरुषांमधील स्पर्मचं प्रमाण अतिशय कमी होतं. त्यामुळे गर्भधारणेची शक्यतादेखील कमी होते. पुरुषांसाठी गर्भनिरोधक जेलची निर्मिती करण्यात डॉ. डायना ब्लिथे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'अनेक महिला साईड इफेक्ट्सच्या भीतीनं गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर टाळतात. तर पुरुषांसाठी असलेले गर्भनिरोधक कॉन्डम आणि नसबंदीपर्यंतच मर्यादित आहेत. त्यामुळे गर्भनिरोधक क्षेत्रात हे जेल अतिशय परिणामकारक ठरुन सार्वजनिक आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,' असा विश्वास ब्लिथे यांनी व्यक्त केला. पुरुषांसाठी गर्भनिरोधक म्हणून काम करणाऱ्या या जेलला एनईएस/टी असं नाव देण्यात आलं आहे. हे जेल पुरुष आपल्या पाठीला आणि खांद्यांना लावू शकतात. यानंतर हे जेल त्वचेतून शरीरात प्रवेश करतं. या जेलमध्ये टेस्टोस्टेरॉनसोबत सेजेस्टेरॉन वापर करण्यात आलं आहे. सेजेस्टेरॉन पुरुषांच्या शरीरात उपलब्ध असलेल्या टेस्टेस्टेरॉनची नैसर्गिक निर्मिती थांबवतं. त्यामुळे स्पर्म निर्माण होण्याचं प्रमाण काही वेळासाठी खूप कमी होतं. मात्र याचवेळी  रिप्लेसमेंट टेस्टेस्टेरॉन शरीर संबंधांसाठी आवश्यक असणाऱ्या शरीरातील इतर क्रिया सुरूच ठेवतं. लवकरच याची चाचणी जगभरातील 420 जोडप्यांवर केली जाणार आहे. हे जेल नेमकं किती प्रभावी आहे, याबद्दलची माहिती चाचणीतून मिळू शकेल. 

टॅग्स :Healthआरोग्यSex Lifeलैंगिक आरोग्य