शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडिअन समय रैना आले होते Anxiety Attack, हा नेमका काय त्रास, लक्षणं काय आणि कसा कराल बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:15 IST

Samay Raina Anxiety Attack : समय रैनाला एंझायटी अ‍ॅटॅक येत होते. पण हा एंझायटी अ‍ॅटॅक काय असतो, त्याची लक्षणं काय असतात आणि त्यातून कसं बाहेर पडावं? या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. 

Samay Raina Anxiety Attack :  समय रैना हे नाव काही आता नवीन राहिलेलं नाही. तरूणाईमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे. त्याचे स्टँड-अप कॉमेडीचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. इंडियाज गॉट लेटेंट कंट्रोव्हर्सीनंतर समय पुन्हा एकदा चाहत्यांसमोर 'स्टिल अलाईव्ह' शोच्या माध्यमातून आला आणि सगळीकडे पुन्हा एकदा त्याचीच चर्चा रंगली. तब्बल १४ महिने तो सगळ्या गोष्टींपासून दूर गेला होता. समय रैनाने खुलासा केला की, वादानंतर त्याचं मोठं आर्थिक नुकसान तर झालंच, सोबतच त्याचं मानसिक नुकसानही झालं. त्याला एंझायटी अ‍ॅटॅक येणे सुरू झाले होते. पण अनेकांना हा एंझायटी अ‍ॅटॅक काय असतो हेच माहीत नाही. अशात हा एंझायटी अ‍ॅटॅक काय असतो, त्याची लक्षणं काय असतात आणि त्यातून कसं बाहेर पडावं? या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. 

काय असतो एंझायटी अ‍ॅटॅक?

आजचं जगणं असं झालंय ना की, एंझायटी अ‍ॅटॅक येणं किंवा सतत चिंतेत, तणावात राहणं फारच कॉमन झालंय. बरं याबाबत एक मोठा गैरसमज आहे की, एंझायटी अॅटॅकला लोक हार्ट अॅटॅक समजून टेंशन घेतात. पण मुळात ही मानसिक आरोग्यासंबंधी एक समस्या आहे. एंझायटी अॅटॅक हा जवळपास पॅनिक अ‍ॅटॅकशी मिळता - जुळता असतो. हा आला की, व्यक्तीला काहीही कारण नसताना अचानक भीती आणि धोक्याची भावना जाणवते. हा अ‍ॅटॅकचा पारा काही मिनिटांमध्ये वर वर चढतो आणि ५ ते ३० मिनिटांपर्यंत राहतो. पॅनिक अ‍ॅटॅक अचानकपणे येतो, तर सामान्य एंझायटी हळूहळू वाढते आणि कायम राहते.

एंझायटी अ‍ॅटॅकची लक्षणं

जर आपल्याला एंझायटी अ‍ॅटॅक आला तर अचानक खूप घाबरल्यासारखं वाटतं, भीती वाटते आणि काही शारीरिक लक्षणं दिसतात. एक्सपर्ट मानतात की, ही लक्षणं इतकी तीव्र होऊ शकतात की, आपल्याला हार्ट अ‍ॅटॅक येत असल्यासारखं वाटतं. 

कशामुळे येतो?

एंझायटीच्या मुख्य कारणांमध्ये जास्त तणाव, कामाचा ताण, कौटुंबिक अडचणी, आर्थिक चिंता, एखादी मोठी घटना, ट्रॉमा, कॅफीन किंवा काही औषधे यांचा समावेश करता येईल. जेनेटिक्स, मेंदू रसायनांचं असंतुलन आणि लाइफस्टाईल याला वाढण्यात मोठी भूमिका निभावतात.

एंझायटीपासून बचावाचे उपाय

सायकॉलॉजिस्ट सांगतात की, एंझायटीची समस्या दूर करण्यासाठी सगळ्यात आधी लाइफस्टाईलमुळे बदल करावा. तसेच ब्रीदिंग म्हणजे श्वासासंबंधी व्यायामाचा सराव करा. या गोष्टींमुळे मानसिक दबाव आणि तणाव कमी होईल. 

जर अ‍ॅटॅक पुन्हा पुन्हा येत असेल आणि रोजचं जगणं विस्कळीत होत असेल किंवा भीती वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी दिली जाते. गरज असल्यास औषधे सुद्धा दिली जातात. मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की, एंझायटी अ‍ॅटॅक काही फार घातक नाही, पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर त्रास वाढू शकतो. जागरूकता आणि योग्य उपाय केल्यास जगणं सोपं, सामान्य होऊ शकतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Comedian Samay Raina's Anxiety Attack: Understanding Symptoms and Prevention

Web Summary : Comedian Samay Raina revealed his anxiety attacks after a controversy. Anxiety attacks involve sudden fear and physical symptoms, often mistaken for heart attacks. They're triggered by stress, trauma, or lifestyle factors. Management includes lifestyle changes, breathing exercises, and, if needed, therapy or medication. Early intervention ensures a normal life.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स