शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

RESEARCH : ​...तर शरीरात ‘या’ ठिकाणी लपलेला असतो ‘एड्स’ व्हायरस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 18:16 IST

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, एड्स या भयंकर रोगाचा व्हायरस मानवी शरीरात कोठे सापडतो याची माहिती मिळाली आहे...

-Ravindra Moreसंपूर्ण जगभरात करोडो लोकांना एड्स सारख्या महाभयंकर रोगाने कवटाळले आहे. या रोगाची एकदा का लागण झाली तर मृत्यु शिवाय पर्याय नाही. अनेक संशोधन होऊनही आजदेखील या रोगावर प्रभावी औषध उपलब्ध नाही. मात्र एक आनंदाची बातमी अशी की, या रोगाचा व्हायरस शरीरात कोठे लपतो, याची माहिती मिळवण्यात संशोधकांना नक्कीच यश आले आहे.फ्रान्सच्या सीएनआरएस रिसर्च इस्टीट्यूटच्या संशोधकांनी याबाबत दावा केला आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, एड्स या भयंकर रोगाचा व्हायरस मानवी शरीरात कोठे सापडतो याची माहिती मिळाली आहे. संशोधनानुसार, मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींमध्ये एड्सचा व्हायरस लपतो. शरीरातील पांढऱ्या रक्तपेशीच या व्हायरसला जागा देत असल्यामुळे एचआयव्हीवर नियंत्रण मिळवणाऱ्या औषधांना हा व्हायरस दाद देत नाही. दरम्यान, एड्सच्या व्हायरसचे लपण्याचे ठिकाण सापडणे हे एक संशोधनातले मोठे पाऊल आहे. त्यामुळे लवकरच पांढऱ्या पेशींमधल्या एड्सच्या व्हायरसचे समूळ उच्चाटण करण्याबाबतचा उपाय शोधला जाईल. त्याबाबत दूरगामी संशोधनही सुरू झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.या बाबतच्या संशोधनाचे वृत्त नेचर पत्रीका नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशीत करण्यात आले आहे. हे संशोधन एड्सवर केल्या जाणाऱ्या संशोधनाचे नेतृत्व करेन तसेच, हा व्हायरस नेस्तनाबूत करण्यासाठीही हे संशोधन काम करेल, असेही या जर्नलमध्ये दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, एचआव्हीवर सध्या कोणताच इलाज नाही. त्यामुळे या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर औषधे घेऊनच जगावे लागते. सुरूवातीला डॉक्टरी उपायांनी आणि औषधांनी हा आजार नियंत्रणात येतो. मात्र, काही वर्षांनी हा आजार पुन्हा डोके वर काढतो. एचआयव्ही आजाराने पीडित व्यक्तीच्या शरीरात सुमारे २०० अरब सीडी ४ टी पेशी असतात. त्यातील १० लाखांपैकी कोणतीही एक पेशी एड्सचा व्हायरस लपविण्याचे काम करते.