शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खांदा मजबूत करण्यासाठी ही आसने उपयुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 15:49 IST

आपल्या शरीराचा खांदा हा अवयव खूपच महत्वाचा आहे. खांद्यामुळे माणसाला उभे रहाणे, झोपणे, उठणे अशा अनेक हालचाली सहज करण्यास मदत होते. या हालचाली करण्यासाठी खांद्यामधील सांध्याची हालचाल महत्वाची ठरते.

आपल्या शरीराचा खांदा हा अवयव खूपच महत्वाचा आहे. खांद्यामुळे माणसाला उभे रहाणे, झोपणे, उठणे अशा अनेक हालचाली सहज करण्यास मदत होते. या हालचाली करण्यासाठी खांद्यामधील सांध्याची हालचाल महत्वाची ठरते. खांद्याचा सांधा हा शरीरातील एक नाजूक व अस्थिर सांधा आहे. त्याची रचना हालचाल सुलभ करण्यासाठी पूरक असल्याने या सांध्याद्वारे आपण दिवसभर अनेक हालचाली अगदी सहजपणे करु शकतो. आपले खांदे मजबूत असल्यास हात पुढे, मागे करणे, हात अगदी ३६० अंशातून गोलाकार फिरवणे देखील सहज शक्य होते. पण जर खांदेच मजबूत नसतील तर अशा हालचालींमुळे प्रसंगी तुमचा खांदा निखळून तुम्हाला एखादी गंभीर दुखापत देखील होऊ शकते. खांद्याचे कार्य सुरळीत सुरु रहाण्यासाठी या सांध्याला जोडणाºया टीश्यूज मजबूत असणे आवश्यक आहे. तसेच तोल सांभाळणे, ताकद व योग्य अलायमेंट साठी देखील खांद्याचा सांधा महत्वाचा ठरतो. वयोमानानूसार तुमच्या सांध्यामधील लवचिकता व हालचाल कमी होते.त्यात जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर तुमची कार्य करण्याची क्षमता देखील हळूहळू कमी होऊ लागते. खांद्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी योगासने करणे नक्कीच फायद्याचे ठरु शकते.* पर्वतासन खांदा हा अस्थिर सांधा असल्यामुळे त्याला मजबूत करणे आवश्यक असते.कारण कमजोर व कमकुवत खांद्याला सतत वेदना व दुखापतीला सामोरे जावे लागते.त्यामुळे या आसनामध्ये डोक्याच्या दिशेने हात ताणले गेल्यामुळे खांद्यांसह सर्वांगाला चांगला ताण मिळून आराम मिळू शकतो.जाणून घ्या योगा व स्ट्रेचिंगमध्ये नेमका काय फरक असतो.* शिर्षासनशिर्षासन करुन तुम्ही तुमच्या खांद्याचे सांधे मजबूत करु शकता.पण हे आसन करताना पाठीमागच्या दिशेने झुकताना तुमचे खांदे पिळले जाणार नाहीत याची विशेष दक्षता घ्या.* पवनमुक्तासनया आसनामध्ये पाठ व मान वर घेताना खांद्यांवर पुरेसा ताण येतो.त्यामुळे आसन सोडताना पाठ व मानेच्या मणक्याला आराम देताना तुमचे खांदे देखील सैल सोडणे तितकेच गरजेचे आहे.* मालासनमालासन करताना तुमच्या पाठीवर चांगला ताण येतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.यासाठी हे कठीण आसन केल्यावर श्वासावर लक्ष देऊन आराम करा. * टिटीभासन बकासन करताना तोल सांभाळणे किंचित आव्हानात्मक नक्कीच असू शकते.त्यामुळे तुम्ही पडणार नाही याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.या स्थितीमध्ये काही अंशात स्थिर रहाण्यासाठी प्रचंड ताकदीची गरज असते.