शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

प्लास्टिकमुळे होऊ शकतो हृदयरोग, संशोधकांचा धक्कादायक दावा, वेळीच घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 17:08 IST

आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र याच प्लास्टिकमुळे हृदयाचे विकार (Heart disease) आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढू शकतं, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.

प्लास्टिक (Plastic) हा आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक झाला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र याच प्लास्टिकमुळे हृदयाचे विकार (Heart disease) आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढू शकतं, असं एका अभ्यासात समोर आलं आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया-रिव्हरसाइड विद्यापीठातल्या (University of California-Riverside) स्कूल ऑफ मेडिसिनच्या (School of Medicine) शास्त्रज्ञांनी हा नवीन दावा केला आहे. या अभ्यासानुसार, प्लास्टिक अधिक टिकाऊ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे फ्थॅलेट प्लाझ्मा (phthalate plasma) कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. एन्व्हायर्न्मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्ह्ज (Environmental Health Perspectives) नावाच्या जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

कोलेस्टेरॉल हा मानवी पेशींच्या बाहेरच्या बाजूस एका विशेष घटकानं बनलेला थर असतो. त्याला वैद्यकीय भाषेत कोलेस्टेरॉल किंवा लिपिड म्हणतात. कोलेस्टेरॉलचे चांगला आणि वाईट असे दोन प्रकार आहेत. चांगलं कोलेस्टेरॉल प्रथिनं, कार्बोहायड्रेट्सइतकंच महत्त्वाचं असतं, तर वाईट कोलेस्टेरॉल मानवी शरीरासाठी धोकादायक असतं. कमी घनता असलेलं लिपोप्रोटीन (Lipoprotein) हेदेखील एक वाईट कोलेस्टेरॉल आहे. जेव्हा लिपोप्रोटीनमध्ये प्रथिनांच्या जागी चरबीचं प्रमाण वाढू लागतं, तेव्हा शरीरातल्या वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. असं झाल्यास हृदयविकाराच्या धोक्यामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होते.

तज्ज्ञ काय म्हणतात?यूसीआर स्कूल ऑफ मेडिसिनमधले (UCR School of Medicine) प्रोफेसर चांगचेंग झोऊ (Changcheng Zhou) यांनी प्लास्टिकच्या वापरावर केलेल्या संशोधनाबाबत माहिती दिली आहे. 'डीसीएचपी (DCHP) म्हणजेच डायसायक्लोहेक्सिल फ्थॅलेट (Dicyclohexyl Phthalate) हे शरीरातल्या प्रिग्नॅन एक्स रिसेप्टरशी (pregnane X receptor) अतिशय घट्टपणे जुळत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे, अशी माहिती प्रोफेसर झोऊ यांनी दिली. डीसीएचपी पोटात गेल्यानंतर तो पीएक्सआरचा घटक बनून जातं आणि कोलेस्टेरॉलचं शोषण आणि वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख प्रथिनांना उत्प्रेरित करतं.

डीसीएचपी पीएक्सआर सिग्नलिंगद्वारे आतड्यामध्ये उच्च पातळीत कोलेस्टेरॉल तयार करतं. फ्थॅलेट प्लास्टिसायझर (phthalate plasticizer) म्हणून डीसीएचपी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, असंदेखील झोऊ म्हणाले. पर्यावरण संरक्षण एजन्सीने (Environmental Protection Agency) काही दिवसांपूर्वीच डीसीएचपीशी संबंधित धोक्यांचं मूल्यांकन प्रस्तावित केलं आहे; मात्र मानवी आरोग्यावर त्याचे थेट परिणाम काय आहेत याबद्दल अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही.

'उंदरांचा अभ्यास करून प्रथमच डीसीएचपी, कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग यांच्यातल्या संबंधांवर प्रकाश टाकला गेला आहे. उच्च पातळीचं कोलेस्टेरॉल (High Cholesterol) किंवा डिस्लिपिडेमिया (Dyslipidemia) आणि हृदयविकारावर होणारा प्लास्टिकचा परिणाम या संशोधनातून लक्षात येतो, असं प्रोफेसर चांगचेंग झोऊ म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग