शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर हे वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 13:33 IST

फिरायला गेल्यावर आपण बाहेरच पाणी पीत नाही. त्याला पर्याय म्हणून आपण सोबत बॉटलमध्ये पाणी घेऊन जात असतो किंवा सोबत पाणी घेऊन नाही गेलो तरी प्लॅस्टिकच्या बॉटल मधून पाणी पीत असतो

मुंबई, दि. 20 - शाळा, कॉलेज, ऑफिस, बाहेर फिरायला जाताना किंवा हॉटेलमध्ये आपण बाहेरच पाणी पीत नाही. त्याला पर्याय म्हणून आपण सोबत बॉटलमध्ये पाणी घेऊन जात असतो किंवा सोबत पाणी घेऊन नाही गेलो तरी प्लॅस्टिकच्या बॉटल मधून पाणी पीत असतो. प्लॅस्टिक हे शरीर तसेच पर्यावरणासाठी हानिकारक आहे व यावर न्यायालयाने बंदी देखील घातली आहे. पण तरीही आपण सर्रास प्लॅस्टिकचा वापर करतो. पण कधी विचार केला आहे का की प्लॅस्टिक वॉटर बॉटलचं पाणी पिण्यास सुरक्षित आहे का? नाही ना तर मग आज आपण जाणून घेणार आहोत प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं किती सुरक्षित आहे?

- प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लॅस्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.

- लेबल असलेली बाटली फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.

- दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी पिणे म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे.

- पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं  तरच त्या सुरक्षित असतात.

- तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी. 

- पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करणे, हा मोठा धोका?मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. प्लॅस्टिक पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमच्या पिण्याच्या पाण्यात मिसळतात. मात्र, असं काही नाही की तुम्ही पाण्याचा पुनर्वापर करू शकत नाहीत. फक्त स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याचा पुनर्वापर करणार असाल तर निदान त्या नीट धुवून घ्या. शक्यतो बाटल्या गरम पाण्याने धुवा. कोणत्याही प्लॅस्टिकमध्ये बॅक्टेरीआचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा प्लॅस्टिकमधून पाणी पिणे हे जास्त हानिकारक असते. अशा बाटल्यांचा धोका वाढल्याने, अनेक देशांनी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे.

 

टॅग्स :Waterपाणी