शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानवी शरीरात पहिल्यांदाच बसविली डुकराची किडनी, अमेरिकेत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:08 IST

डॉक्टरांच्या टीमने १६ मार्च रोजी वेमाउथ येथे राहणाऱ्या रिचर्ड स्लेमॅन यांच्यावर ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्वस्थ असून, लवकरच त्यांना घरी सोडले जाईल. 

वॉशिंग्टन : अमेरिकेत बोस्टनमध्ये मॅसेच्युएट्स जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच मानवी शरीरात डुकराच्या जनुकीय बदल केलेल्या  किडनीचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केले आहे. यामुळे किडनीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. १९५४ मध्ये याच हॉस्पिटलमध्ये जगातील पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने १६ मार्च रोजी वेमाउथ येथे राहणाऱ्या रिचर्ड स्लेमॅन यांच्यावर ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्वस्थ असून, लवकरच त्यांना घरी सोडले जाईल. 

जेनेट्रान्सप्लांटेशन क्षेत्रात नवा अध्याय बाबत लेंगॉन ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटचे डॉ. रॉबर्ट माँटेगोमेरी यांनी सांगितले की, जेनेट्रान्स प्लांटेशनच्या क्षेत्रात यामुळे नवा अध्याय लिहिला गेला आहे. जेव्हा मानवाला बिगर मानवी शरीरापासून म्हणजेच इतर प्राण्यांपासून  काढलेला एखादा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे बसविला जातो, त्या प्रक्रियेला जेनेट्रान्सप्लांटेशन असे म्हणतात. 

शास्त्रज्ञांनी नेमके काय केले? स्लेमॅन यांना बसविलेली किडनी मॅसेच्युएट्स जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने विकसित केली. शरीरात या किडनीचे प्रत्यारोपण करण्याआधी किडनीत काही जनुकीय बदल केले आहेत. यावर संशोधक गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत होते. शास्त्रज्ञांनी प्रथम डुकराच्या किडनीतील रेट्रोव्हायरसला नष्ट केले. यामुळे मानवी शरीरात संक्रमण होण्याची भीती होती. त्यानंतर डुकराच्या किडनीमध्ये मानवी जनुके जोडण्यात आली. 

रुग्णांना मोठा दिलासा स्लेमॅन यांना गेल्या ११ वर्षांपासून किडनीचा आजार होता. २०१८ मध्ये त्यांना मानवी किडनी प्रत्यारोपणाद्वारे बसविली होती; परंतु पाच वर्षांत किडनी खराब झाली. त्यामुळे २०२३ पासून स्लेमॅन डायलिसिसवर होते. या आजारपणातून त्यांना सुटका मिळावी यासाठी अखेर डॉक्टरांनी त्यांना डुकराची किडनी बसवण्याचा निर्णय घेतला. जगभरात लाखो जण किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. असंख्य जणांना जिवाला मुकावे लागले आहे. हे उपचार खूप महागडे  असतात. अशा आजारांवर करण्यात येणारी शस्त्रक्रिया जटिलही असते. 

टॅग्स :Healthआरोग्य