शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

अ‍ॅलोपॅथीसोबतच फिजिओथेरपीही महत्त्वाची; श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 02:01 IST

डॉ. संजय ओक यांची माहिती

अतुल कुलकर्णी

मुंबई : कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया किंवा निरनिराळ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रकार दिसून आले आहेत. काही रुग्णांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या दिसून आल्या आहेत. परिणामी त्यातील काहींचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समोर आले आहे. यासाठी अ‍ॅलोपॅथीसोबत फिजिओथेरपीही महत्त्वाची आहे. तसेच श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक आहे, अशी माहिती सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’ला दिली.

आपण सगळे कोविडमध्ये गुंतून पडलो, पण त्यामुळे नंतर होणाºया परिणामांकडे दुर्लक्ष झाले आहे. कोविड झालेल्या व्यक्तीची काळजी नंतरचे ४० दिवस ते ४ महिने घेणे आवश्यक आहे, असे आता वेगवेगळ्या निष्कर्षातून समोर आले आहे. त्यासाठी शासनाने ‘पोस्ट सिंड्रोम ओपीडी’ तयार करावी, त्यात तज्ज्ञ डॉक्टर असावेत, त्यात रक्ताच्या चाचण्या व्हाव्यात, सिटीस्कॅनसह पल्मनरी फंक्शन टेस्ट केली जावी, अशा सूचना टास्क फोर्सने सरकारला केल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.

हृदयविकाराचा धोकाअनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले, पण दहा दिवसानंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचे कारण रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे आहे. या गुठळ्या शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्येही होत आहेत. त्यामुळे पायाच्या पोटºया दुखणे, विलक्षण थकवा येणे असे परिणाम दिसत आहेत. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे, मेंदूकडे जाणाºया रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्याने पक्षाघात होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे, असे डॉ. ओक म्हणाले.

श्वसनाचे व्यायाम कराअ‍ॅलोपॅथीमध्ये रक्त पातळ होण्यासाठीचे औषध रुग्णाला दिले जाते. सुरुवातीच्या काळात अशी औषधे दिलेली नव्हती. मी स्वत: आजारी पडलो, त्यानंतर म्हणजे मे-जून नंतर दहा दिवसांच्या औषधांचा कोर्स दिला जात आहे. आता मात्र ज्यांना रक्त आणि हृदयाचे त्रास आहेत अशांना सरसकट रक्त पातळ होणारी औषधे दिली जात आहेत. मात्र त्याला मर्यादा असल्याचे सांगून डॉ. ओक म्हणाले, अशी औषधे फार काळासाठी अशा रुग्णांना देता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या यकृतावर त्याचा परिणाम होऊ शकतो. रेमडेसीविर हे औषधही अशा रुग्णांच्या यकृतावर परिणाम करते, हे ज्ञात आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅलोपॅथीला मर्यादा पडत आहेत. फिजिओथेरपीला आता पर्याय नाही. दुर्दैवाने आपण त्याकडे लक्ष दिले नाही. अशा रुग्णांची फुप्फुस व्यवस्थित होण्यास ८ ते १२ आठवडे लागतात. त्यासाठी रोज ४५ मिनिट श्वसनाचे व्यायाम करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक म्हणाले.स्वत: डॉक्टर बनू नका!लेंडीपिंपळी वनस्पतीचा दुधातून काढा मी स्वत: घेत आहे. दालचिनी, लवंग पाण्यात भिजवून त्याचे सेवन करत आहे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. मात्र अशा औषधांची, त्याच्या खरेपणाची तपासणी करूनच ती घ्यावी, त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरना विचारा. त्यांच्या सल्ल्याने काढे, औषधे घेतली पाहिजेत. स्वत: परस्पर डॉक्टर होऊ नका आणि आयुर्वेदिक काढे मनाने घेऊ नका, असा सल्लाही डॉ. ओक यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या