शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अननस? पडू शकतं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 11:43 IST

Pineapple Disadvantages : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी अननस खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कुणी अननसाचं सेवन करू नये हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Pineapple Disadvantages :  अननस एक टेस्टी आणि शरीराला अनेक पोषक तत्व देणारं फळ आहे. भरपूर लोक आवडीने अननस खातात. यातून व्हिटॅमिन सी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळतं. मात्र, अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी अननस खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कुणी अननसाचं सेवन करू नये हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अननस कुणी खाऊ नये?

१) गॅस आणि पोटाची समस्या असणारे

अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एझांइम असतं जे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण याने काही लोकांचं पोट उत्तेजित होतं. पोटासंबंधी समस्या असलेल्या लोकांना अननसाचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे किंवा करूच नये. 

२) गर्भवती महिला

गर्भावस्थेदरम्यान अनेक महिला अननसाचं सेवन करतात, पण यातील ब्रोमेलिनने गर्भाशयात समस्या होऊ शकते. याने गर्भपाताचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत अननसाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

३) अल्सर असलेल्या रूग्णांनी

जर तुम्हाला पोटात किंवा आतड्यांमध्ये अल्सर असेल तर अननसाचं सेवन केल्यावर तुम्हाला असहजता आणि वेदना होऊ शकते. ब्रोमेलिन आणि अॅसिडिक नेचरमुळे तुमच्या अल्सरची स्थिती आणखी खराब होऊ शकते. 

४) शुगर असलेल्यांनी

अननसाचा ग्लालसेमिक इंडेक्स मध्यम असतो. पण यात शुगरचं प्रमाण जास्त असतं. डायबिटीस किंवा हाय शुगर लेव्हलच्या रूग्णांनी अननसाचं सेवन केलं तर शुगर वाढू शकते. शुगरच्या रूग्णांमुळे ब्लड शुगर लेव्हल प्रभावित होतं. अशा लोकांनी अननसाचं सेवन कमी प्रमाणात करावं.

५) अ‍ॅलर्जी असलेल्यांनी

काही लोकांना अननसाची अ‍ॅलर्जी होऊ शकते. अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये खाज, सूज किंवा त्वचेवर लाल चट्टे यांचा समावेश आहे. जर कुणाला अननस खाल्ल्यावर अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य