शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:35 IST

टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह ( diabetes) असलेल्या ज्या लोकांचा बीपी रात्री वाढतो त्यांनी सावध राहिले पाहिजे. कारण रात्री वाढलेला बीपी त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतो.

डायबिटीस हा एक क्रॉनिक आजार आहे ज्यामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि लक्षणे नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. पण टाईप १ आणि टाइप २ डायबिटीसमुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रणात ठेवणे देखील तितकेच महत्वाचे असते.

रिसर्चमधुन धक्कादायक खुलासाअमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिकमध्ये अलीकडेच सादर केलेल्या तब्बल २१ वर्षांच्या अभ्यासानुसार, टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह ( diabetes) असलेल्या ज्या लोकांचा बीपी रात्री वाढतो त्यांनी सावध राहिले पाहिजे. कारण रात्री वाढलेला बीपी त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतो. ज्या लोकांचा ब्लड प्रेशर रात्री स्थिर किंवा कमी असतो त्यांच्यापेक्षा हा वाढणा-या लोकांचा बीपी दोन पट जास्तच आहे. जर तुम्हाला देखील डायबिटीस असेल तर तुम्हाला देखील पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

साधारणत: रात्री झोपेच्या दरम्यान ब्लड प्रेशर (blood pressure)कमी होतो. जर रात्रीच्या वेळी ब्लड प्रेशर पुरेश्या प्रमाणात कमी होत नसेल तर त्याला नॉन-डिपिंग म्हणतात. जर बीपी दिवसा ऐवजी रात्री वाढू लागला तर या स्थितीला रिव्हर्स डिपिंग असे म्हणतात. हा असामान्यपणे वाढलेला ब्लड प्रेशर टाइप १ आणि टाइप २ डायबिटीस असलेल्या लोकांच्या हृदयाशी संबंधित समस्यांसाठी व मृत्यू होण्याचा धोका वाढवण्यास जबाबदार ठरतो. त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बीपी नियंत्रित करण्याचा सल्ला तज्ञांकडून हमखास दिला जातो.

१० पैकी १ व्यक्तीला धोकाअभ्यासात असं दिसून आलं की टाइप १ ( type 1 diabetes) किंवा टाइप २ (type 2 diabetes) मधुमेह असलेल्या १० पैकी १ व्यक्तीला रिव्हर्स डिपरची समस्या असू शकते. इटलीच्या पिसा विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ क्लीनिकल एंड एक्सपेरीमेंटल मेडिसनच्या इंवेस्टीगेटर मार्टिना चिरियाको म्हणतात की, प्रत्येक तज्ज्ञाने टाइप १ आणि टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमधील रक्तदाब तपासावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह