शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

एएमडीग्रस्त वयोवृद्धांपैकी एक तृतीयांश रुग्णांना असतो अपघाताने पडण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 8:08 PM

एएमडीग्रस्त व्यक्तींनी स्थिती सुधारण्यासाठी उपचारांचा नियमितपणे पाठपुरावा करायला हवा आणि दर सहा महिन्यांनी रितसर तपासणी करून घ्यायला हवी.

मुंबई - एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन मध्ये कोणतीही गोष्टी सुस्पष्टपणे पाहता येणे अशक्य झाल्यामुळे वयोवृद्ध असलेल्या रुग्णांपैकी एक तृतीयांश (७४%) रुग्णांना पडून वा पडण्याव्यतिरिक्तच्या अन्य कारणांमुळे त्यांना बरेचदा गंभीर शारीरिक दुखापतीला सामोरे जावे लागले असल्याचे एका पाहणीतून आढळून आले आहे. एएमडी ही स्थिती केंद्रीय दृष्टी (सेंट्रल व्हिजन)च्या ऱ्हासामागचे प्रमुख कारण आहे व ६५ वर्षांहून वरच्या वयोगटातील जवळ- जवळ १०% व्यक्तींवर तसेच ७५ वर्षांच्या वयोगटातील २५% हून अधिक व्यक्तींवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. एएमडीच्या रुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या दृष्टीदोषाचा थेट संबंध हा पडण्याच्या वाढत्या घटनांशी आहे. एमएमडी ही स्थिती वयोवृद्धांशी संबंधित काही अत्यंत गंभीर आणि सर्वत्र आढळून येणाऱ्या समस्यांपैकी एक आहे, ज्यात दुखापतींमुळे मृत्यू ओढावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.  

बॉम्बे हॉस्पिटलचे ऑप्थल्मोलॉजिस्ट आणि डोळ्यांचे तसेच व्हिट्रिओरेटिनल सर्जन व मुंबई रेटीना सेंटरचे सीईओ डॉ. अजय दुदानी सांगतात, ''एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) सारखे रेटिनाशी संबंधित आजार हे दुर्धर असतात. या आजाराचे वेळच्यावेळी निदान होऊन लगेच उपचार केले गेल्यास एमएमडीला प्रतिबंध करण्यास मदत मिळू शकते. ही स्थिती सुधारण्यासाठी संबंधित व्यक्तीने उपचारांचा नियमितपणे पाठपुरावा करायला हवा आणि दर सहा महिन्यांनी रितसर तपासणी करून घ्यायला हवी. या आजाराशी अपघाताने पडणे आणि नैराश्य यांसारखे इतर अनेक घटकही जोडले गेलेले आहेत, ज्यांच्यामुळे रुग्णाच्या जगण्याचा दर्जा खालावण्याचा धोका असतो. लवकर झालेले निदान आणि वेळेत मिळालेले उपचार यांच्यामुळे रुग्णांना ही आव्हाने पार करण्यासाठी मदत मिळते.''

एएमडी रुग्णांचे अपघाताने पडणे टाळण्यासाठीच्या ५ टिप्स:  1)रुग्णाची देखभाल करणा-यांनी घरामध्ये सुरक्षित वातावरण तयार करून रुग्णांना शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत केली पाहिजे. 2) व्यायामाच्या मदतीने शरीराची ताकद आणि तोल सांभाळण्याची क्षमता यांत सुधारणा घडवून आणली पाहिजे. 3) घरातील प्रकाशयोजनेमध्ये सुधारणा केली पाहिजे. 4) पांढऱ्या छडीचा वापर (अंध व्यक्तींकडून वापरले जाणारे साधन). 5) निसरड्या पादत्राणांचा वापर टाळला पाहिजे.