शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एका क्षयरुग्णामुळे होतो १५ जणांना संसर्ग; खोकताना, थुंकताना काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:44 IST

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिका पत्रकार कक्षात शुक्रवारी मुंबई महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ. पुरी, डॉ. राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई : जीवघेण्या क्षयरोगाला पूरक परिस्थिती मुंबईतील अनेक भागात आहे. अनेक भागात प्रदूषणामुळे तसेच हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे क्षयरुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे निरीक्षणातून समोर आल्याचे पालिकेने म्हटले आहे. एका क्षयरुग्णाकडून जवळपास १० ते १५ जणांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकताना आणि थुंकताना काळजी घ्या, असा सल्लाही पालिकेने दिला आहे.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिका पत्रकार कक्षात शुक्रवारी मुंबई महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ. पुरी, डॉ. राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड साथीनंतर घराघरातील क्षयरुग्णांपर्यंत पोहोचणे पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना शक्य नव्हते. अशा काळात क्षयाचे रुग्ण शोधण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र, कोविड निर्बंध आणि इतर सवयींमुळे संसर्ग आजार बळावणेही कमी झाले होते. आता कोणालाही सदृश लक्षणे दिसत असतील तर टीबीचे निदान करणे सोपे झाले आहे. ३ ते ४ तासात तुम्हाला टीबी आहे हे सिद्ध करणाऱ्या चाचण्या पालिका केंद्रात उपलब्ध आहेत. रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून पालिका आरोग्य केंद्रात तत्काळ निदानासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले. सीएसआर अंतर्गत क्षयरुग्ण उपचारासाठी ७ मशीन कार्यरत आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालयात कल्चर आणि डीएसटी लॅब जून २०२३ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.  लहान मुलांसाठी जेजे आणि वाडिया रुग्णालयात बालरोग डीआरटीबी केंद्र आहेत. 

थुंकणे टाळा, खोकताना रुमालाचा वापर करा  पालिका आणि शासनाकडून कितीही उपाययोजना राबविण्यात आल्या तरी क्षयाचे प्रमाण रोखणे नागरिकांच्या हातीच आहे.   एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या विभागात लोकांनी रस्त्यात थुंकणे टाळले, खोकताना तोंडावर रुमाल धरला आणि आवश्यक काळजी घेतली तेथे क्षयरुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.   दरम्यान, मुंबईसारख्या शहरात वावरताना प्रत्येकाने खोकताना आणि थुंकताना तोंडावर रुमाल आणि समोरच्या माणसानेसुद्धा काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही डॉ. गोमारे यांनी दिला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य