शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉनवर वॅक्सिन कधी येणार? या कंपनीने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 19:51 IST

फार्मा कंपनी Moderna Incने सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास २०२२च्या सुरुवातीस तयार होऊ शकते.

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर सध्या चर्चा होतेय. फार्मा कंपनी Moderna Incने सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास २०२२च्या सुरुवातीस तयार होऊ शकते.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन, जुन्या डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक मानला जातोय आहे आणि कोरोनाच्या सध्याच्या लसीचा त्यावर परिणाम होणार नाही अशी चिंता व्यक्त केली जातेय. यावर मॉडर्नाने गरज भासल्यास २०२२ च्या सुरुवातीस ते यासाठी लस तयार करू शकतात असं सांगितलं आहे.

सुमारे १४ देशांमध्ये पोहोचला नवा व्हेरिएंटओमायक्रॉन वेगाने पसरत असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत तो जवळपास १४ देशांमध्ये पोहोचला असल्याची माहिती आहे. याआधी जगाने कोरोना डेल्टा व्हेरिएंटने घातलेला धुमाकूळ पाहिला. अशा परिस्थितीत, अनेक देशांनी आधीच सावध होऊन ओमायक्रॉन टाळण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत.

WHOचं म्हणणं काय?प्राथमिक पुराव्यानुसार, ज्यांना आधी कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा लोकांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांना सहज संसर्ग होऊ शकतो. WHOच्या म्हणण्यानुसार, "कोरोना लसीवर या प्रकाराचा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी WHO काम करत आहे. 'ओमायक्रॉन'मुळे अधिक गंभीर आजार होतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही."

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन