शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने संसर्ग पसरतो, नव्या स्टडीतून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:42 IST

Omicron Variant : या स्टडीमधील निष्कर्ष पाहता ओमायक्रॉनबाबत चिंता वाढवणारी आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. स्टडीद्वारे या व्हेरिएंटबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटवर आता हाँगकाँग युनिव्हर्सिटीची नवीन स्टडी आली आहे. 

या स्टडीमधील निष्कर्ष पाहता ओमायक्रॉनबाबत चिंता वाढवणारी आहेत. मात्र, या नवीन व्हेरिएंटमुळे लोक फारसे गंभीर आजारी पडत नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांकडून मिळालेल्या डेटावर केलेल्या स्टडीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा आणि मूळ कोरोना स्ट्रेनच्या तुलनेत जवळपास 70 पट वेगाने संक्रमित करतो. मात्र, गंभीर आजार खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

स्टडीत काय म्हटले आहे? संसर्गाच्या 24 तासांनंतर ओमायक्रॉन श्वसन प्रणालीमध्ये खूप वेगाने पसरतो, असे स्टडीत आढळून आले आहे. संशोधकांच्या टीमचे म्हणणे आहे की, आपल्या मूळ स्वरूपाच्या तुलनेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये 10 पट कमी प्रतिकृती बनवतो, जो 'कमी तीव्र' असल्याचे दर्शवते. स्टडीनुसार, ओमायक्रॉन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरतो. परंतु फुफ्फुसाच्या ऊतींना त्याच्या पूर्वीच्या व्हेरिएंटइतके नुकसान होत नाही.

दरम्यान, जरी हा व्हायरस स्वतः कमी रोगजनक असला तरीही अनेक लोकांना संक्रमित करून, एक अतिशय संसर्गजन्य व्हायरस अधिक गंभीर आजार आणि मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो, असे स्टडीचे प्रमुख लेखक चॅन म्हणाले. लस आणि पूर्वीच्या संसर्गापासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीपासून सुद्धा ओमायक्रॉन संरक्षण करू शकतो. त्यामुळे तो धोकादायक असण्याचीही शक्यता आहे.

शास्त्रज्ञ अजूनही त्याच्या संसर्गाचा दर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळून आल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत, हा व्हेरिएंट किमान 77 देशांमध्ये पसरला आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर असेही म्हणतात की, आतापर्यंतचे बहुतेक संक्रमण सौम्य आहेत आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. बरेच संशोधक अशी शक्यता देखील व्यक्त करत आहेत की, जास्त म्युटेट होणारे व्हेरिएंट्स इतर स्ट्रेनना देखील जन्म देऊ शकतात. यामुळे, महामारी हळूहळू कमकुवत होईल आणि मर्यादित राहील आणि जग त्याबरोबर जगायला शिकेल.

सावधगिरी महत्त्वाचीओमायक्रॉनच्या सुरूवातीच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही किंवा त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले जात नाही. काही लोकांमध्ये पुन्हा संसर्गाची प्रकरणे देखील आढळून येत आहेत, जी फार गंभीर नाहीत. मात्र, अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना लोकांना सावधगिरी बाळगण्याचा, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा, योग्य प्रकारे मास्क लावण्याचा आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस