OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 14:58 IST
आपल्या डोक्यावरील टक्कल आपल्या व्यक्तिमत्वाला मारक ठरतेय?
OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !
-Ravindra Moreपुरुषांमध्ये आढळणारे डिहायड्रोटेस्टोस्टेरोन हार्माेनचे संतुलन बिघळल्याने पुरुषांच्या डोक्याच्या पुढच्या भागाचे केस वेगाने गळतात. सोबतच ही समस्या पुरुषांच्या अनहेल्दी डायट आणि ताणतणावच्या कारणानेही उद्भवते. ही समस्या काही घरगुती उपायाने नियंत्रणात आणली जाऊ शकते. चला जाणून घेऊया काय आहेत घरगुती उपाय.१) नारळाचे दूध आणि आवळानारळाचे दूध, आवळा आणि लिंबूचा रस प्रत्येकी एक-एक चमच घेऊन मिश्रण तयार करा. या मिश्रणाने केसांची किमान ५ मिनिटापर्यंत मसाज करा. त्यानंतर २० मिनिटाने धुवा.२) मेथीदाणे आणि नारळ तेलदोन चमच नारळ तेल आणि एक चमच मेथीदाणे एकत्र करुन थोडे गरम करा. थंड झाल्यानंतर डोक्यावर मसाज करा. २० मिनिटाने धुवून टाका. असे आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा. ३) मेंदीचे पानमेंदीचे ८ ते १० पाने मोहरीच्या तेलात टाकून उकाळून घ्या. थंड झाल्यानंतर डोक्याचा मसाज करा. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. ४) दही आणि बेसनदोन-दोन चमच दही आणि बेसन एकत्र करा. या मिश्रणाला डोक्याला आणि केसांना लावा. अर्ध्यातासाने धुवून टाका. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. ५) मध आणि आॅलिव्ह आॅइलदोन दोन चमच मध आणि आॅलिव्ह आॅइल तसेच एक चमच दालचिनी पावडर घेऊन एकत्र करा. या मिश्रणाला संपूर्ण डोक्याला लावा. १५ मिनिटानंतर धुवून टाका. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा.६) कांद्याचा रस आणि मधएक-एक चमच कांद्याचा रस आणि मध घ्या. एकत्र करुन रोज डोक्याला लावा.७) नारळ तेल आणि आवळाचार चमच नारळ तेल आणि आवळ्याचे दोन तुकडे एकत्र करुन गरम करावे. या मिश्रणाने रोज डोक्याची मसाज करावी आणि २० मिनिटाने अंघोळ करावी. ८) अंडे आणि आॅलिव्ह आॅइलएका अंड्यात दोन चमच आॅलिव्ह आॅइल मिक्स करा. या मिश्रणाला संपूर्ण डोक्याला लावा. ३० मिनिटानंतर धुवा. असे आठवड्यातून दोन ते तिनदा करा. ९) लिंबू आणि आवळ्याचा रसलिंबूचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणात घेऊन डोक्याला लावा. अर्ध्यातासाने धुवा. असे आठवड्यातून तिन ते चारवेळा करा. १०) बदाम तेल आणि कांद्याचा रसदोन चमच कांद्याच्या रसात एक चमच बदाम तेल मिक्स करा. या मिश्रणाला डोक्याला लावून रात्रभर राहूद्या. सकाळी धुवा. असे आठवड्यातून दोन ते तिनदा करा.