शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

OMG : ​स्तन कर्करोगाने भारतात सर्वाधिक मृत्यू, जगात अव्वल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 16:16 IST

भारतात प्रत्येक दोन स्तन कॅन्सरग्रस्त स्त्रियांपैकी एकीचा मृत्यू होतोय. जगात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यामध्ये स्तन कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही भारताचा यात पहिला क्रमांक लागतो.

-Ravindra Moreभारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणात झपाट्याने वाढत आहे. भारतात प्रत्येक दोन स्तन कॅन्सरग्रस्त स्त्रियांपैकी एकीचा मृत्यू होतोय. जगात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यामध्ये स्तन कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही भारताचा यात पहिला क्रमांक लागतो. ही बाब अत्यंत भयावह आहे. ब्रेस्ट कॅन्सर इंडियातर्फे एक माहिती समोर आली आहे, त्यात वर्ष २०१२ मध्ये भारतात १ लाख ४४ हजार ९३७ स्त्रियांना नव्याने स्तन कॅन्सर झाल्याची नोंद आहे. याच वर्षी ७० हजार २१८ महिलांचा स्तन कॅन्सरने मृत्यू झाला. वर्ष २०१५ मध्ये हे प्रमाण खूप वाढले नसले तरी कमी झाले नाही. स्तन कॅन्सर होणे जरी आपण थांबवू शकत नाही, मात्र योग्य वेळी निदान व औषधोपचार घेतल्याने मृत्यूदर मात्र निश्चित कमी करता येऊ शकतो. कॅन्सरविषयी जागरूकता पसरवणे गरजेचे आहे. वेळीच निदान झाले तर मृत्यूदर कमी करता येऊ शकतो परंतु विश्व आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात ६० टक्के महिलांचा कॅन्सर तिसºया किंवा चौथ्या स्टेजवर लक्षात येतो. अशा रुग्णांना वाचवणे फार कठीण ठरते. विशेष म्हणजे भारतीय स्त्रियांचे स्वत:च्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मुख्य कारण आहे. त्यातच  कौटुंबिक, मानसिक, आर्थिक अशा अनेक अडचणींना सामोरे जाताना या स्त्रिया स्वत:च्या शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अनेक दिवस छातीत वाढत असलेली गाठ दुखत नसल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करतात. नंतर जेव्हा त्रास जाणवायला लागतो तोपर्यंत कॅन्सरची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असते. उपचारादरम्यान केमोथेरपी, रेडिओथेरपी या सगळ्यांमध्ये सहन करावा लागणारा शारीरिक व मानसिक त्रास सोसताना महिलेची व सोबचत कुटुंबियांची अवस्था फार वाईट होते. या सर्व गोष्टी आपल्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर स्वत:ची काळजी घ्यायला शिका. कुटुंबियांकडे लक्ष देणे जशी तुमची जबाबदारी आहे तशीच स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणेदेखील तुमचीच जबाबदारी आहे. आज जागतिक कर्करोग दिवसाच्या निमित्ताने स्वत:ची व सोबतच अवती-भोवती असलेल्यांची काळजी घेण्याचा निर्धार करूया. Also Read : ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित !                  : ‘ब्रेस्ट कॅन्सर’ वर सोनाचा संदेश !