शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आता डेंग्यू-चिकनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांसाठी मिळणार विमा संरक्षण; असा होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 19:40 IST

insurance : डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख व्हेक्टर जनित आजार आहेत.

ठळक मुद्देआयआरडीएच्या या आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत तुम्हाला डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर एक वर्षाचा विमा मिळू शकेल.

नवी दिल्ली: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आता व्हेक्टर जनित (डास, माश्यांपासून फैलावणारे आजार) आजारांसाठी विमा पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर भागधारकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख व्हेक्टर जनित आजार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, संक्रमणाच्या आजारांमध्ये व्हेक्टर जनित आजार हे 17 टक्के आहेत आणि यामुळे वर्षाला 7 लाखांहून अधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पॉलिसीअंतर्गत एक वर्षाचा विमाआयआरडीएच्या या आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत तुम्हाला डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर एक वर्षाचा विमा मिळू शकेल. सध्या तयार केलेल्या प्रस्तावानुसार या प्रोडक्टला  एक वर्षाच्या कालावधीसाठी जारी केले जाऊ शकते. यामध्ये वेटिंग पीरियड (प्रतीक्षा कालावधी) 15 दिवसांचा असेल. या विमा पॉलिसीमध्ये डेंग्यू, मलेरिया, फाइलेरिया, ब्लॅक-अझर, चिकनगुनिया, जपानी एन्सेफलायटीस आणि झिका व्हायरससारख्या व्हेक्टर जनित आजारांचा समावेश असेल.

प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, या प्रोडक्टचे नाव व्हेक्टर बॉर्न डिसीज हेल्थ पॉलिसी असेल. हे एक 'सिंगल प्रीमियम' प्रोडक्ट असेल. म्हणजेच फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. या प्रीमियम प्रोडक्टसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

...म्हणून गरजेचा आहे आरोग्य विमाव्हेक्टर जनित आजार लक्षात घेऊन आम्ही येत्या काळात ग्राहकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. भारतातील डेंग्यू, मलेरिया यासारख्या व्हेक्टर जनित आजारामुळे बरेच लोक बाधित आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो. या आजारांवर उपचार न मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैशांची कमतरता असणे आहे. त्यामुळे अशा आजारांच्या उपचारासाठी आरोग्य विमा मिळविणे फार महत्वाचे आहे, असे पॉलिसी बाजारचे आरोग्य विमा प्रमुख अमित छाबरा यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यbusinessव्यवसाय