शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:48 IST

कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.

- अमोल अन्नदाते,एका प्रसिद्ध आयुर्वेद कंपनीने मोठी जाहिरात करून बाजारात आणलेले कोरोनावरील औषध अजून कोरोना साठीचे अंतिम औषध किंवा रामबाण उपाय म्हणून मान्यता मिळालेले नाही. आयुष मंत्रालय व आयसीएमआरने या औषधाची जाहिरात थांबवावी, असे निर्देशही या कंपनीला दिले आहेत. आयुर्वेदाचा कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.संबंधित कंपनीने आणलेल्या औषधांचे ट्रायल घेतले आहे, असा दावा त्यांच्याकडून केला गेला आहे. पण, एखादे क्लिनिकल ट्रायल यशस्वी आहे व संबंधित औषध आता वापरले जाऊ शकते, यासाठी काही निकष असतात. यात किती लोकांवर ते केले आहे (सॅम्पल साईज), त्या अभ्यासाचा प्रकार कसा होता (स्टडी डिझाईन), त्या क्लिनिकल ट्रायलचे विश्लेषण करण्यासाठी हाती आलेल्या निकालाचे कसे विश्लेषण केले आहे. (स्टॅटीस्टीकल मेथड), त्याचे नंतर टीकात्मक विश्लेषण (क्रिटीकल अ‍ॅनॅलिसीस) झाले का व याचे स्टॅस्टीटीक्स म्हणजे संशोधनातील आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्यां कडून चाचपणी व इतर तज्ज्ञांकडून मते मागवणे (पीर रिव्हीव्यू) या कुठल्याही पद्धतीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलेले दिसत नाही. या कंपनीचे आयुर्वेदिक औषधच काय, पण इतर कुठले ही अ‍ॅलोपॅथीचे औषध ही अजून या निकषात बसून कोरोनासाठी शंभर टक्के उपचार म्हणून मान्यता पावलेले नाही. नुकतेच जे औषध एका कंपनीने बाजारात आणले आहे त्याचा प्रचार समाज माध्यमांवर व वैयक्तिक पातळीवर सुरु झाला आहे. पण, अशा औषधापासून सर्वांनी सावध राहायला हवे. आयुर्वेद नक्कीच पुरातन चिकित्सा पद्धती आहे व आयुष मंत्रालय यावर वेळोवेळी निर्देश देते आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे सोडूनइतर कुठले ही कंपनीचे कोरोनासाठी उपाय म्हणून बाजारात आणलेले औषध घेऊ नये. तसेच आयुष मंत्रालयाचे बहुतांश निर्देश हे प्रतिबंधासाठी आहेत. हे घेत असताना अ‍ॅलोपॅथीचे उपचार सोडू नये.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या