२०१८ हे वर्ष आता सरत आलंय आणि २०१९ या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लोक नव्या वर्षात नव्या गोष्टी करण्याचा विचार करु लागले आहेत. अनेकजण नव्या वर्षात नवनवीन संकल्प करतात. पण नेहमीच्या संकल्पांपेक्षा सध्या वेगळ्या प्रकारचे संकल्प करण्याची गरज निर्माण झाली. म्हणजे सध्याची लाइफस्टाइल बघता आरोग्यासंबंधी काहीतरी संकल्प केल्यास फायदा तुमचा होईल. आम्ही तुम्हाला अशाच काही संकल्पांबाबत सांगणार आहोत, जे फॉलो करुन तुम्ही येणाऱ्या वर्षात हेल्दी आणि फिट राहू शकाल.
जेवण बनवायला शिका
सध्याची लाइफस्टाइल पाहता आणि बाहेरच्या पदार्थांची क्वालिटी बघता स्वत: जेवण बनवणे शिकायला हवे. अनेकदा असं होतं की, तुम्हाला घरापासून दूर राहण्याची गरज पडते. अशात तुम्हाला स्वत: जेवण करता येत नसल्याचा पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे नव्या वर्षात तुम्ही हा संकल्प फॉलो करु शकता. कमीत कमी बेसिक पदार्थ तरी तुम्हाला तयार करता यायला हवे, अशी तयारी ठेवा. हे केलं तर तुम्हाला बाहेरचं खाण्याची गरज पडणार नाही. आता तर यूट्यूब आणि सोशल साइट्सच्या माध्यमातून हे काम आणखी सोपं झालंय.
हाय प्रोटीन डाएट
हाय-प्रोटीन डाएटने जास्त कॅलरी बर्न होतात. जर तुम्हाला तुमचं वाढलेलं वजन कमी करुन फिट व्हायचं असेल तर जास्तीत जास्त हाय प्रोटीन फूडचा आहारात समावेश करण्याचा संकल्प करा. प्रोटीन हे शरीरासाठी महत्त्वाचं मॅक्रोन्यूट्रेंट असतं. जे शरीराची प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी गरजेचं असतं. तसेच प्रोटीनमुळे शरीरातील पेशी मजबूत होतात आणि हार्मोन्सही नियंत्रित राहतात.
घरचं जेवण
घरच्या जेवणाने तुमची पैशांचीही बचत होते आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. बाहेरचं खाल्ल्याने केवळ पैसेच खर्च होत नाही तर तुमच्या आरोग्यावरही याचा प्रभाव पडतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने तुमचं वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे घरी तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने तुम्ही हेल्दी राहू शकता. तसेच या पदार्थांमध्ये काय टाकायचं आणि काय नाही हेही तुम्ही ठरवू शकता.
भाज्या आणि फळं जास्त खावीत
भाज्या आणि फळांमुळे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्त्व मिळतात, यांच्या मदतीने आपण फिट आणि हेल्दी राहतो. फळे स्नॅक्स म्हणून खाल्ली तर तुम्हाला याचा जास्त फायदा बघायला मिळतो. हिरव्या भाज्या आणि फळांमुळे शरीराला कॅल्शिअम, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. याने वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव होतो.
कोल्ड्रींकऐवजी ज्यूस
अनेकजणांना कोल्ड्रींक पिण्याची सवय असते. पण या थंडपेयांमुळे शरीराला वेगवेगळे नुकसान होतात. याने भूक तर मारली जातेच शिवाय वजन वाढण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे हे टाळून तुम्ही केवळ फळांचे ज्यूस, नारळाचं किंवा हेल्दी ज्यूस सेवन करण्याचा संकल्प करु शकता.
अनेकजण नव्या वर्षासाठी वेगवेगळी संकल्पे ठरवतात. पण यातील पूर्ण किती केले जातात हे त्यांनाच माहीत. मग अशात ही नवीन प्रकारचे फायदेशीर संकल्प केले तर तुम्हाला ते पूर्ण करायला सोपे होतील.