शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

डायबिटीसच्या रुग्णांसाठी गुड न्यूज! फ्रिजमध्ये न ठेवताही सुरक्षित राहणार 'हे' नवं इन्सुलिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:56 IST

इन्सुलिन ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक असतं. लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी रुग्ण औषधं आणि कधीकधी इन्सुलिन इंजेक्शन घेतात. जेव्हा त्यांना कुठेतरी प्रवास करावा लागतो तेव्हा इन्सुलिन सोबत नेण्यास अडचण येते. कारण इन्सुलिन ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक असतं. लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.

रूम टेम्प्रेचरला इन्सुलिन सुरक्षितहे इन्सुलिन Thermostable असेल (खोलीच्या तपमानात सुरक्षित). हे कोलकाताच्या बोस इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (IICB) च्या दोन शास्त्रज्ञांसह हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) च्या दोन शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे.

बोस इन्स्टिट्यूटचे शुभ्रंगसू चॅटर्जी यांच्यासह आयआयसीबीचे शास्त्रज्ञ पार्थ चक्रवती, IICTचे बी जगदीश आणि जे रेड्डी यांनी यावर संशोधन केलं, त्यानंतर हे इन्सुलिन तयार करण्यात आलं आहे.

फ्रिजमधून बाहेर काढणं शक्यया संशोधनाचा उल्लेख आंतरराष्ट्रीय विज्ञान जर्नलमध्येही करण्यात आला आहे. बोस इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक सदस्य शुभ्रांगसू चॅटर्जी यांच्या मते, 'तुम्ही हे इन्सुलिन तुम्हाला हवं तोपर्यंत फ्रीजमधून बाहेर ठेवू शकता. यानंतर, जगभरातील मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिन सोबत नेणं सोपं होईल.

'इन्सुलॉक' नाव आहेत्यांनी सांगितलं की, सध्या आम्ही त्याचे नाव 'इन्सुलॉक' ठेवलं आहे. आम्ही लवकरच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे (DST) आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या नावं या इन्सुलीनला द्यावं यासाठी अपील करणार आहोत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह