शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन येणार; गर्भधारणेची चिंता 13 वर्षे टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 12:14 IST

इंजेक्शनच्या सर्व चाचण्या पूर्ण; लवकरच आरोग्य मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळणार

नवी दिल्ली: नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आता पुरुषांना नसबंदी करण्याची गरज भासणार नाही. कारण लवकरच गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. भारतीय संशोधकांनी या इंजेक्शनची निर्मिती केली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या देखरेखीखाली इंजेक्शनची चाचणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला सोपवण्यात आला. त्यामुळे लवकरच या इंजेक्शनच्या वापराला हिरवा कंदील मिळू शकतो.गर्भधारणा टाळण्यासाठी आतापर्यंत पुरुषांना शस्त्रक्रिया करावी लागायची. मात्र यापुढे तशी गरज भासणार नाही, अशी माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये संशोधक असलेल्या डॉ. आर. एस. शर्मांनी दिली. आता केवळ इंजेक्शनच्या मदतीनं गर्भधारणा रोखता येईल. चाचणीत हे इंजेक्शन 95 टक्के यशस्वी ठरलं आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन घेतल्यावर 13 वर्षे गर्भधारणा रोखता येते. या इंजेक्शनमुळे 13 वर्षे गर्भधारणा टाळता येते, याची आकडेवारी आमच्याकडे आहे. मात्र हे इंजेक्शन त्याहीपेक्षा जास्त काळ काम करेल, असा आम्हाला विश्वास असल्याचं शर्मांनी सांगितलं. असं काम करतं इंजेक्शन?आयआयटी खरगपूरमधील संशोधक डॉ. एस. के. गुहा यांनी इंजेक्शनमध्ये वापरलं जाणारं औषध तयार केल्याची माहिती शर्मा यांनी दिली. या औषधात सिंथेटिक पॉलिमर आहे. नसबंदी करताना दोन नसा कापून उपचार केले जातात. मात्र यामध्ये त्याच दोन नसांमध्ये इंजेक्शन दिलं जातं. या दोन नसांमधून शुक्राणू पुढे सरकतात. त्यामुळेच गर्भधारणा रोखण्यासाठी या दोन्ही नसांमध्ये इंजेक्शन दिलं जातं. या इंजेक्शनमध्ये 60 मिलीचा एक डोस असतो. गर्भनिरोधक इंजेक्शन दिल्यावर शुक्राणू तुटतात. त्यामुळे गर्भधारणा होत नाही, अशी माहिती डॉक्टर शर्मा यांनी दिली. उंदीर, ससा आणि त्यानंतर इतर प्राण्यांवर या इंजेक्शनची चाचणी घेण्यात आली आहे. माणसांवरही या इंजेक्शनची चाचणी घेण्यात आली. एकूण 303 व्यक्तींना दोन टप्प्यांमध्ये इंजेक्शन देण्यात आलं. यातून हे इंजेक्शन गर्भधारणा रोखण्यात 99.2 टक्के यशस्वी ठरल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्यMedicalवैद्यकीय