शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

New Body Part: मानवी शरीरात नवीन अवयवाचा शोध, या अवयवाचे काम पाहून शास्त्रज्ञ झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:29 IST

New Body Part: शास्त्रज्ञांनी आपल्या शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लावला आहे. या अवयवाबद्दल आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हती. जाणून घ्या हा अवयव आपल्या शरीरात काय काम करतो.

New Body Part: शास्त्रज्ञांना मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लागला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांना शोधादरम्यान आपल्या श्वसनसंस्थेला (Respiratory System) निरोगी ठेवणाऱ्या एका नवीन अवयवाचा शोध लागला आहे. या नव्या अवयवामुळे शास्त्रज्ञांना आशेचा नवा किरण मिळाला आहे. त्यांना आशा आहे की, या अवयवामुळे धुम्रपानामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यास मदत होईल. अनेक वेळा धूम्रपानामुळे होणारे आजार रुग्णांसाठी प्राणघातक ठरतात.

पेशीसारखा दिसणारा अवयवलाइव्ह सायन्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मानवी शरीरात सापडलेला हा नवीन अवयव इतर पेशींसारखाच दिसतो. हा फुफ्फुसांमध्ये असलेल्या पातळ आणि अतिशय नाजूक शाखांमध्ये आढळतो. शास्त्रज्ञांनी या नवीन अवयवाला रेस्पिरेटरी एअरवे सेक्रेटरी(Respiratory Airway Secretory - RAS) असे नाव दिले आहे. रास पेशी स्टेम पेशींसारख्या असतात, त्यांना रिक्त कॅनव्हास पेशीदेखील म्हणतात.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, संशोधकांना आढळले की, रास पेशी फुफ्फुसांवर अवलंबून असते. कारण त्यांचे सर्व काम फुफ्फुसांशी संबंधित यंत्रणांद्वारे चालते. शास्त्रज्ञांनी निरोगी व्यक्तीच्या फुफ्फुसाचे ऊतक(टिश्यू) घेतले, यानंतर प्रत्येक पेशीच्या आत असलेल्या जनुकांचे विश्लेषण केले असता त्यात त्यांना रास पेशी आढळून आल्या.

मुंगूसमध्येही याच पेशी आढळून आल्यापेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर एडवर्ड मॉरिसे म्हणाले की, मानवी फुफ्फुसाच्या शाखा(हवेचा मार्ग) उंदरांच्या फुफ्फुसांपेक्षा वेगळ्या असतात, हे आधीपासून माहित होते. पण, नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही नवीन पेशी शोधण्यात मोठी मदत झाली आणि आम्ही त्याचा नमुना तपासू शकलो. संशोधनामध्ये असेही आढळून आले की, मानवांव्यतिरिक्त मुंगूस प्रजातीच्या फेरेट्सच्या(Ferrets)  फुफ्फुसातदेखील रास पेशी आढळल्या आहेत. या मानवांमध्ये आढळणाऱ्या रास पेशींसारख्याच आहेत.

काय आहे RAS पेशींचे काम ?RAS पेशी असे कण सोडतात, ज्या ब्रॉन्किओल्स (रक्तामध्ये ऑक्‍सीजन आणि कार्बन डायऑक्‍साइड सोडणारा)मध्ये वाहणाऱ्या द्रवरुपी पदार्थांवर एक अवरण बनवण्याचे काम करते. यामुळे आपल्या फुफुसाची क्षमता अधिक वाढते. या प्रोजेनिटर पेशींप्रमाणे, म्हणजेच एल्वियोलर टाइप-2 (एटी2) पेशींप्रमाणे काम करतात. या एक विशेष प्रकारच्या पेशी आहेत, ज्या दुखापतग्रस्त पेशींना ठीक करण्यासाठी रसायन तयार करतात.

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके