शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' भाज्या जास्त शिजवल्याने होतात खराब, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 10:20 IST

Vegetables Cooking Tips : बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की, काही भाज्या जास्त शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात आणि ते शरीराला मिळत नाहीत.

Vegetables Cooking Tips :  भाज्या खाऊन आपल्या शरीराला पोषण मिळतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे एक्सपर्ट्सही रोज वेगवेगळ्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की, काही भाज्या जास्त शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात आणि ते शरीराला मिळत नाहीत.

भाज्यांमध्ये शरीर मजबूत करणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. सोबतच डायबिटीस, हार्ट अटॅक, कॅन्सरपासून वाचवण्याची क्षमता असते. पण भाज्याचं सेवन करूनही लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहे. त्यामागचं कारण म्हणजे भाज्या चुकीच्या पद्धतीने बनवणं. चुकीच्या पद्धतीमुळे भाज्यांमधील पोषक तत्व नष्ट होतात.

भाज्यांमध्ये अनेक न्यूट्रिएंट असतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स किंवा इतरही पोषक तत्वे असतात. अशात भाज्या जास्त शिजवल्या तर हे पोषक तत्व नष्ट होतात. प्रत्येक भाज्यांचं एक तापमान असतं. या भाज्या त्यापेक्षा जास्त शिजवल्या तर खराब होतात.

एका शोधानुसार, जास्त तापमानावर शिजवल्याने क्रूसिफेरस व्हेजिटेबल्समधील पोषण कमी होतं. त्यामुळे या भाज्या जास्त आसेवर जास्त वेळ शिजवणं टाळलं पाहिजे.

ब्रोकली

ब्रोकली एक क्रूसिफेरस भाजी आहे. यात कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. ही भाजी वजन कमी करण्यास आणि कॅन्सरपासून वाचवण्यासाठी महत्वाची मानली जाते.

फूलकोबी

फूलकोबी सुद्धा क्रूसिफेरस फॅमिलीतील भाजी आहे. ही भाजी गट बॅक्टेरियाचं बॅलन्स ठेवते. पोटासाठी ही भाजी खूप चांगली असते. याने इंफ्लामेशन कमी होतं आणि सेल्स डॅमेजपासूनही बचाव होतो.

कांदा 

जास्त तापमानावर शिजवल्याने कांद्यातील वॉटर कंटेंट कमी होतं. कांदा उन्हाळ्यात थंडावा देण्याचं काम करतो. पण त्याला जास्त भाजलं किंवा शिजवलं  तर यातील अॅंटी-बॅक्टेरिअर तत्व कमी होतात.

लसूण

लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं. जर ते नष्ट झालं तर लसणातील अर्धी शक्ती निघून जाते. याने ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. जास्त आसेवर त्याला भाजल्याने, तळल्याने किंवा शिजवल्याने यातील हे पोषक तत्व कमी होतं.

भाज्या बनवण्याची योग्य पद्धत

भाज्या उकडून, स्टीमिंग, ग्रिलिंग, रोस्टिंग, ब्लाचिंग, फ्राइंग करून बनवल्या जातात. यातील तुम्ही तुम्हाला हवी ती पद्धत निवडू शकता. पण काळजी घ्या की, त्यातील पोषण कमी होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न