शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

तुम्ही विक्षिप्त आहात? किंवा अधूनमधून करता विक्षिप्तपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:30 IST

..मग तुमच्या आयुष्याची दोरी इतरांपेक्षा अधिक बळकट आहे!..

ठळक मुद्देतब्बल पाच लाखापेक्षाही अधिक लोकांची चाचणी३७ ते ७३ या वयोगटातील लोकआरोग्यविषयक सवयींचीही पाहणी

- मयूर पठाडेकाही जण विणाकारण चिडतात, आरडाओरड करतात, चिडचिड करतात, काही जण उगाचंच हसतात, स्वत:शीच बोलतात, काही जण सारखे हात धुतात, कुणी आरशात पाहातात, कुणी शुन्यात बघत बसतात.. असा विक्षिप्तपणा करणारे अनेक जण आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात.. खरं तर विक्षिप्तपणा प्रत्येकाच्याच अंगात असतो, कुणाच्या कमी तर कुणाच्या जास्त..पण विक्षिप्तपणा जास्त असणारे लोकं जरा चटकून दिसून येतात, काही वेळा ओळखूही येतात इतकंच. पण असे विक्षिप्त लोक जास्त काळ जगतात. त्यांच्या आयुष्याची दोरी जास्त काळ टिकू शकते असं एक निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.

ज्यांच्यात जास्त प्रमाणात विक्षिप्तपणा असतो, अर्थातच त्यांच्यात चिडचिडेपणा, फ्रस्ट्रेशन, नर्व्हसनेस, चिंता, काळजी आणि स्वत:विषयी अपराधभाव.. यासारख्या गोष्टीही त्यांच्यात जास्त प्रमाणात असतात.अशा विक्षिप्त लोकांमध्ये बºयाचदा स्वत:ची जास्त काळजी घेणं, प्रोटेक्टिव्हनेसपणा जास्त प्रमाणात आढळून येतो. विशेषत: आपल्या तब्येतीच्या बाबतीत. आणि म्हणूनच हे लोक आरोग्याच्याबाबतीत स्वत:ची जास्त काळजी घेतात. कदाचित हेच कारण असावं की अशा व्यक्ती अधिक काळ जगतात, असा अंदाजही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.एडिनबर्ग विद्यापीठाच्या मुख्य संशोधक कॅथरीन गेल यांनी यासंदर्भात आपलं निरीक्षण नोंदवताना सांगितलं, विक्षिप्त लोकांमध्ये जास्त जगण्याचं आणि मृत्यू उशीरा येण्याचं प्रमाण अधिक असल्याचं आम्हाला आढळून आलं आहे. सगळ्याच प्रकारचे आजार, अगदी कॅन्सरसारख्या अजारांनाही हे लोक कमी प्रमाणात बळी पडतात.या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल पाच लाखापेक्षाही अधिक लोकांची चाचणी घेतली. ३७ ते ७३ या वयोगटातील हे सारे लोक होते.

याशिवाय या अभ्यासात सामील झालेल्या साºया लोकांच्या आरोग्यविषयक सवयीसंदर्भातही माहिती गोळा करण्यात आली. त्यांची फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी काय आहे, व्यायाम वगैरे करतात का, धुम्रपानाची सवय आहे का, त्यांचं ब्लड प्रेशर, बॉडी मास इंडेक्स, आकलन क्षमता, कॅन्सर, डायबेटिस, हृदयविकार.. यासारखे काही आजार त्यांना आहेत का याविषयीही सारा डेटा गोळा करण्यात आला आणि त्यानंतर यासंदर्भातला निष्कर्ष काढण्यात आला.