शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! रहस्यमयी आजाराची दहशत; लहान मुलांच्या लिव्हरवर करतोय अटॅक, 'ही' आहेत लक्षणं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:28 IST

Liver Disease : अनेक देशांत मुलं लिव्हरशी संबंधित आजाराचा सामना करत आहेत. अनेकांना याची लागण झाली आहे.

कोरोना पाठोपाठ आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. चिमुकल्यांना तो आपल्या जाळ्यात ओढत असून त्याची दहशत निर्माण झाली आहे. हा आजार थेट लहान मुलांच्या लिव्हरवर अटॅक करत असल्याने पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अमेरिकेसह अनेक देशांत मुलं लिव्हरशी संबंधित आजाराचा सामना करत आहेत. अनेकांना याची लागण झाली आहे. अमेरिकेसह ब्रिटन, स्पेन, डेन्मार्क आणि नेदरलँडमध्ये या आजाराची प्रकरणं समोर आली आहेत.  

यूकेतील आरोग्य सुरक्षा संस्थेने (UKHSA) 6 एप्रिलला दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ जानेवारी 2022 पासून मुलांमध्ये हेपेटायटिसच्या जवळपास 74 प्रकरणांची तपासणी करत आहेत. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने  (WHO) हा आजार हेपेटायटिस व्हायरसमुळे (Hepatitis Virus) झालेला नाही, असं सांगितलं आहे. काही प्रकरणं ही एडिनो व्हायरस आणि सार्स कोव्ह-2 ची असल्याची माहिती मिळाल्याचं डब्ल्यूएचओने सांगितलं.

रिपोर्टनुसार अमेरिकेच्या अलबामामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 1-6 वर्षे वयोगटातील 9 मुलं या आजाराने ग्रस्त असल्याची आढळली होती. WHO ने सांगितल्यानुसार, यापैकी काही मुलांना स्पेशालिस्ट युनिटमध्ये भरती करावं लागलं. 6 जणांना लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्याची गरज होती. या आजाराची प्रकरणं वेगाने वाढू शकतात अशी शक्यताही WHO ने वर्तवली आहे.

UKHSA च्या मते, या आजाराच्या संभाव्य कारणांमध्ये एडिनो व्हायरसचा एखादा समूह असू शकतो. ज्यामुळे सामान्य सर्दीसारखे श्वसनसंबंधी आजार होतात. या व्हायरसने संक्रमित रुग्ण लवकर बरे होतात. पण हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा आजार वेगाने पसरू शकतो.

अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही मुलं आजारी का पडली आहेत, याची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. पण एडिनो व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्याचं म्हटलं आहे. बहुतेक एडिनो व्हायरसमुळे सर्दी-खोकल्यासारखी लक्षणं दिसतात. ताप, घशात खवखव जाणवते. पण काही प्रकरणात पोट आणि आतड्यांमध्ये सूजेसह इतर समस्याही निर्माण होऊ शकतात. हा आजार एडिनो व्हायरस 41 आणि हेपेटायटिसमुळे होऊ शकतो. पण काही रिसर्चनंतरच स्पष्टपणे सांगू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्य