शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

16 महिन्यांत 5 वेळा हार्ट अटॅक तरी जिवंत आहे महिला; 5 स्टेंट, 6 अँजिओप्लास्टी, डॉक्टर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 10:53 IST

जयपूरहून बोरिवलीला परतत असताना महिलेला सप्टेंबर 2022 मध्ये ट्रेनमध्ये पहिला हार्ट अटॅक आला.

मुलुंडमध्ये राहणाऱ्या 51 वर्षीय महिलेला गेल्या 16 महिन्यांत 5 वेळा हार्ट अटॅक आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पाच स्टेंट, सहा अँजिओप्लास्टी आणि एक कार्डियाक बायपास सर्जरी झाली आहे. 1 ते 2 डिसेंबर दरम्यान तिला हार्ट अटॅक आला. सतत आरोग्याशी संबंधित या गोष्टीचा का सामना करावा लागतोय हे महिलाला आता जाणून घ्यायचं आहे. तसेच तीन महिन्यांनंतर नवीन ब्लॉकेज निर्माण होईल अशी भीती तिला वाटत आहे.

जयपूरहून बोरिवलीला परतत असताना महिलेला सप्टेंबर 2022 मध्ये ट्रेनमध्ये पहिला हार्ट अटॅक आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला अहमदाबाद येथील सार्वजनिक रुग्णालयात नेलं. डॉ. हसमुख रावत हे तिचे दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीचे जुलैपासूनचे हृदयरोगतज्ज्ञ आहेत. दर काही महिन्यांनी हार्ट अटॅकची लक्षणं परत येतात, त्यात तीव्र छातीत दुखणे, ढेकर येणे आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो. 

महिलेने सांगितलं की, मला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये हार्ट अटॅक आला. डायबेटीस, हाय कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यासारख्या इतर समस्याही आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये वजन 107 किलो होतं आणि तेव्हापासून वजन 30 किलो कमी झालं आहे. तिला 'PCSK9 इनहिबिटर' हे कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधाचे इंजेक्शन देण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली आहे आणि डायबेटीस नियंत्रणात आहे, मात्र हार्ट अटॅक सुरूच आहे.

डॉ. रावत म्हणाले की, रुग्णांना एकाच ठिकाणी वारंवार ब्लॉकेजेस होतात हे माहीत नसलं तरी महिलेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन ब्लॉकेजेस विकसित होत आहेत.  पहिला हार्ट अटॅक 90% ब्लॉकेजमुळे आला होता आणि पुढच्या वेळी 99% ब्लॉकेज होतं. वैद्यकीयदृष्ट्या, महिला नशीबवान ठरली, कारण तिला हार्ट अटॅक NSTEMI किंवा नॉन-एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन होता जो हृदयाच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण न झाल्यास होतो. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स