शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

मृणाल म्हणतेय.... मराठी सिनेमाने ग्लोबल व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 00:03 IST

   सोनेरी जादुई छडी हातात घेऊन सोनपरी म्हणुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, अगदी लहान मलांची सुद्धा फेव्हरेट अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृ

      सोनेरी जादुई छडी हातात घेऊन सोनपरी म्हणुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, अगदी लहान मलांची सुद्धा फेव्हरेट अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणालने हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे करुन तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला. अवंतिका या मालिकेतून घराघरात पोहचलेली मृणाल सर्वांचीच लाडकी बनली अन पाहता पहाता छोटा पडदा देखील तिने काबीज केला. अभिनया नंतर मृणाल थेट वळली ते दिग्दर्शनाकडे, २०१४ साली प्रदर्शित झालेल्या रमा-माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले होते. मृणालचा हा अभिनेत्री ते दिग्दर्शक असा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास कौतुकास्पदच आहे. म्हणुनच लोकमत सीएनएक्सने मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत सेलिब्रिटी रिपोर्टरच्या माध्यमातून त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत         मराठी चित्रपट ग्लोबल झाले पाहीजेत. आपले चित्रपट जर जगभरातील प्रेक्षकांनी पहावे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला जागतिक रुप येणे महत्वाचे आहे. आपण सिनेमांचे मार्केर्टिंग जागतिक पातळीपर्यंत करणे आवश्यक आहे. आज युट्युब, इंटरनेटच्या माध्यामातून सिनेमा ग्लोबल होतोय, आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतोय. परंतू सिनेमा जगभरात पोहचण्यासाठी आपण नक्कीच अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.          मराठी चित्रपटांमधील विषय हे नक्कीच वेगळे असतात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग देखील विखुरला गेला एहे. परंतू आपला मराठी रसिक हे क्लास आणि मास मध्ये नाही अडकले. आपल्या मराठी नाटक आणि सिनेमांना वेगळी परंपरा आहे. नाटक अन सिनेमांचे विषय हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांना काय आवडतेय तेच पाहतात. मराठी आॅडियन्स हा नक्कीच क्लास आणि मास मध्ये त्याकरीताच अडकलेला नाही.           ग्रामीण भागात एकतर थिएटर्सची उपलब्धता कमी आहे. त्या समस्येवर आपण विचार करायला पाहिजे. खेड्या-पाड्यात ग्रामीण भागात सिनेमा पोहचवायचा तर तो दाखविणार कु ठे हा प्रश्न आहेच. शिवाय ग्रामीण भागातील प्रेक्षकांची टेस्ट बदलणे गरजेचे आहे. त्यांना वेगळ््या विषयांवरील चित्रपट अपेक्षित असतात. परंतू आता बदलत्या काळानूसार मराठी सिनेमा बदलतोय अन वेगळे विषय आपल्याक डे येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण प्रेक्षकही चेंज होताना दिसतात. त्यामुळे आता सिनेमा ग्रामीण भागातही लवकरच पोहचेल यात शंका नाही.            एकाच वेळी मराठी इंडस्ट्रीमध्ये चार ते पाच सिनेम रिलिज होतात हे खरे आहे. परंतू या गोष्टीला आपण काहीच करु शकत नाही. प्रत्येकालाच असे वाटते की आपण सिनेमा करावा. मग ज्यावेळी रिलिजिंग ची डेट येते त्यावेळी कोणीच मागे हटत नाही. प्रेक्षकांना स्वत:ची चॉईस असते त्यातला कोणता सिनेमा पहायचा. आज आपल्याकडे एवढे न्युजपेपर आहेत कि त्यातले मला जे वाचण्यास योग्य वाटतात तेच चार पेपर मी वाचते. तसेच सिनेमांचे देखील आहे. परंतू चित्रपट रिलिझिंगचा हा प्रश्न कुठेतरी कंट्रोल झाला पाहीजे.               चित्रपटसृष्टी हिंदी असो किंवा मराठी त्यातील प्रत्येकानेच एकमेकांकडुन काहीतरी शिकायला पाहिजे. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काय चालु आहे यासाठी आपले कान, डोळे उघडे असले पाहीजेत. मला असे वाटते सगळ््यांनीच सगळ््यांकडुन सारे काही शिकावे. आज आपली मराठी चित्रपटसृष्टी बदलत आहे. ग्लोबल होत आहे. त्यामुळे मी अस म्हणीन कि बॉलीवुडने देखील मराठी चित्रपटसृष्टीकडुन नक्कीच काहीतरी शिकावे.