शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासादरम्यान मळमळ, उलट्या? प्रवास करणं जिकरीचं होतंय? करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:14 IST

तुम्ही पाहिले असेल की कार किंवा बसमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान लोकांना अनेकदा मळमळ होते, तर बऱ्याच लोकांना उलट्यांचा त्रास देखील होतो. या मागील कारण आणि उपाय दोन्ही जाणून घ्या आणि पुढच्यावेळी प्रवासाला जाण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्या किंवा तुमच्या जवळील व्यक्तीला याबद्दल माहिती द्या.

तुम्ही पाहिले असेल की कार किंवा बसमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान लोकांना अनेकदा मळमळ होते, तर बऱ्याच लोकांना उलट्यांचा त्रास देखील होतो. अशावेळी लोकांना चक्कर येणे, अस्वस्थता, मळमळ किंवा उलट्या यासारख्या समस्या उद्धभवतात. या सगळ्याला मोशन सिकनेस म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, असे फक्त प्रवासादरम्यानच का होते? किंवा असे सगळ्यांसोबत का होत नाही? हे फक्त ठराविक लोकांनाच का होते? तर या मागील कारण आणि उपाय दोन्ही जाणून घ्या आणि पुढच्यावेळी प्रवासाला जाण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्या किंवा तुमच्या जवळील व्यक्तीला याबद्दल माहिती द्या.

प्रवासात उलट्या का होतात?प्रवासात उलट्या होणे याला मोशन सिकनेस लक्षणे म्हणतात. लक्षात ठेवा की मोशन सिकनेस हा एकादा आजार नाही. परंतु ही अशी स्थिती आहे, जेव्हा आपल्या मेंदूला कान, डोळे आणि त्वचेतून वेगवेगळे सिग्नल मिळतात. यामध्ये मध्यवर्ती मज्जासंस्था गोंधळून जाते. परंतु जर तुम्ही काही सावधगिरी बाळगली तर मोशन सिकनेसपासून मुक्त होण्याचे खूप सोपे आहे.

शेवटची सीट टाळाप्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत, असेल तर कोणत्याही मोठ्या वाहनाच्या मागील सीटवर बसणे टाळावे. मागच्या सीटवर वेग जास्त जाणवतो, तसेच त्यावर आपल्याला दचके सुद्धा जास्त जाणवतात. तसेच ड्रायव्हरच्या मागची सीट देखील टाळा.

पुस्तक वाचू नकाप्रवासात उलट्यांचा त्रास होत असल्यास पुस्तक अजिबात वाचू नका. पुस्तक वाचल्यामुळे तुमच्या मेंदूला चुकीचा संदेश जातो.

ताजी हवाजर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर गाडीची खिडकी उघडा आणि बाहेरची ताजी हवा घ्या. संपूर्ण गाडीत ताजी हवा नसल्याने तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो.

रिकाम्या पोटी प्रवास करू नकारिकाम्या पोटी प्रवास केल्यास उलट्या होत नाहीत हा समज लोकांमध्ये आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेकदा जे लोक काहीही न खाता प्रवासाला निघतात, त्यांना मोशन सिकनेसचे प्रमाण अधिक असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जड आहार घ्या. हलका आणि सकस आहार घेऊनच प्रवासाला जा.

हा उपाय कराप्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असल्यास घराबाहेर पडण्यापूर्वी काही सोपी तयारी करा. या सोप्या उपायांमुळे तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

1. जेव्हाही तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा एक एक लिंबू सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला मळमळ वाटत असेल तेव्हा लगेच या लिंबाचा सोलून वास घ्या. याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि असे केल्याने उलट्या होणार नाहीत.2. लवंगा भाजून बारीक करून एका डब्यात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रवासाला जात असाल तेव्हा ते सोबत घ्या. उलट्या होत असल्यास चिमूटभर साखर किंवा काळे मीठ टाकून चोखत राहावे.3. तुळशीची पाने चघळल्याने उलट्या होत नाहीत. याशिवाय लिंबू आणि पुदिन्याचा रस एका बाटलीत काळे मीठ टाकून ठेवा आणि प्रवासादरम्यान ते थोडे-थोडे प्या.4. लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ शिंपडा आणि चाटून घ्या. याने तुमचे मन ठीक राहील आणि उलट्या होणार नाहीत.5. जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर तिथे बसण्यापूर्वी एक पेपर टाका आणि मग बसा. यामुळे तुम्हाला उलट्या होणार नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स