शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सकाळचा नाश्ता न करणं म्हणजे 'या' घातक आजारांना आमंत्रण देणं, वेळीच काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:32 IST

१२ तासांपेक्षा जास्त अंतरानंतर पहिले जेवण घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. न्याहारी न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याविषयी (benefits of having breakfast in the morning) जाणून घेऊया.

मॉर्निंग ब्रेकफास्ट (Morning breakfast) म्हणजे नाश्ता हा दिवसाचा पहिला आणि महत्त्वाचा आहार असतो. दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, पौष्टिक आरोग्यदायी नाश्त्यातून ती मिळू शकते. रोजच्या घाईगडबडीत लोक अनेकदा दिवसातील हा सर्वात महत्त्वाचा आहार टाळतात. १२ तासांपेक्षा जास्त अंतरानंतर पहिले जेवण घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. न्याहारी न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याविषयी (benefits of having breakfast in the morning) जाणून घेऊया.

वजन वाढणेजेव्हा तुम्ही दुपारपर्यंत उपाशी राहता तेव्हा आपल्या शरीराला जास्त उष्मांक असलेल्या अन्नाची गरज असते. भूक कमी करण्यासाठी काहीजण गोड आणि चरबीयुक्त पदार्थ खातात. त्यामुळे वजन वाढतं.

मधुमेहाचा धोकाजेव्हा तुम्ही नाश्ता चुकवता आणि दीर्घकाळानंतर जेवता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अचानक वाढते. या प्रक्रियेत, लोकांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

स्मृतिभ्रंशजपानी जर्नल ऑफ ह्युमन सायन्सेस ऑफ हेल्थ-सोशल सर्व्हिसेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना मानसिक आजार होऊ शकतात. मेंदूच्या पेशींचे कार्य मर्यादित होते आणि तुमची संज्ञानात्मक क्षमता कमी होते, ज्यामुळे स्मृतिभ्रंशसारखे गंभीर आजार होतात.

मायग्रेननाश्ता न केल्याने साखरेची पातळी कमी होऊ शकते, परिणामी तुमचा बीपी वाढतो. उच्च रक्तदाबामुळे, सुरुवातीला किरकोळ डोकेदुखी होऊ शकते जी नंतर गंभीर मायग्रेनमध्ये बदलू शकते.

चयापचयावर परिणामआपल्या शरीराला सकाळी काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जेव्हा तुम्ही दिवसाचा पहिला आहार स्कीप करता तेव्हा ते चयापचय क्रियांना अडथळा आणते आणि ही प्रक्रिया मंदावते.

प्रतिकारशक्ती कमी होतेन्याहारीमधून आवश्यक पोषक घटक शरीराला मिळणं गरजेचे असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी आवश्यक असते. न्याहारी न केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या काम करू शकत नाही, ज्यामुळे तुम्ही लवकर आजारांना बळी पडता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स