शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दिवसातून तीन कपांपेक्षा जास्त कॉफीच्या सेवनाने होते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 10:22 IST

आतापर्यंत असं मानलं जात होतं की, डोकेदुखीचा त्रास झाल्यावर कॉफीचं सेवन केल्याने आराम मिळतो. पण एका रिसर्चमधून हा समज खोटा ठरवण्यात आला आहे.

(Image Credit : curiosity.com)

आतापर्यंत असं मानलं जात होतं की, डोकेदुखीचा त्रास झाल्यावर कॉफीचं सेवन केल्याने आराम मिळतो. पण एका रिसर्चमधून हा समज खोटा ठरवण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला आहे की, कॉफीचं अधिक सेवन केल्याने मायग्रेनची समस्या होऊ शकते. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दिवसातून तीन कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफीचं सेवन केल्याने मायग्रेनचा धोका वाढू शकतो. अमेरिकेतील  बेथ इज्राइल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये अभ्यासकांनी मायग्रेन आणि कॅफीनयुक्त पेय यातील संबंधाचा अभ्यास केला.

(Image Credit : www.valparaisochiropractor.com)

हॉर्वर्ड टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एलिजाबेथ मोस्तोफस्की यांच्या टीमला आढळलं की, ज्या लोकांना कधी कधी मायग्रेनची तक्रार होते, त्यांना एकदा किंवा दोनदा कॅफीनयुक्त पेय पदार्थांचं सेवन केल्याने त्या दिवशी डोकेदुखी झाली नाही. तीन कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफी सेवन केल्याने त्यांना त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डोकेदुखी झाली.

हे सुद्धा आहे कारण

(Image Credit : dunyanews.tv)

मोस्तोफस्की म्हणाल्या की, पूर्ण झोप न घेण्यासोबतच इतरही कारणांमुळे मायग्रेनचा धोका वाढू शकतो. पण कॅफीनची भूमिका विशेष रूपाने अडचणीची आहे. कारण एकीकडे याने डोकेदुखीचा धोका वाढतो, तर दुसरीकडे याने डोकेदुखीवर नियंत्रण करण्यातही मदत मिळते.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञ सांगतात की, तुम्हाला जर कधी मायग्रेनचा त्रास झाला आणि उपचारासाठी तुमच्याकडे कोणतही औषध नसेल तर कॉफीचं सेवन करणे टाळा. कारण कॉफीने तुम्हाला भविष्यात फार नुकसान होऊ शकतं. तज्ज्ञ सांगतात की, डोकेदुखी दूर करण्यासाठी कॉफी सेवन करण्याऐवजी नॅच्युरल थेरपीचा वापर करावा. 

मायग्रेनची समस्या काय आहे?

(Image Credit : hmccentre.com)

मायग्रेन ही डोकेदुखीची एक गंभीर समस्या आहे. सामान्यपणे यात अर्ध डोकेदुखी होते आणि थांबून थांबून डोकं दुखतं. कधी कधी पूर्ण डोकंही दुखतं. हा त्रास २ तासांपासून ते ७२ तासांपर्यंत कायम राहतो. अनेकदा वेदना सुरू होण्याआधी रूग्णाला संकेतही मिळतात. ज्याद्वारे त्यांना वेदना होणार याची कल्पना आलेली असते.

या संकेतांना 'ऑरा' असं म्हटलं जातं. मायग्रेनला थ्रॉबिंग पेन इन हेडॅक असंही म्हटलं जातं. यात जणू डोक्यावर हातोडा मारल्यासारखी जाणीव होते. ही वेदना इतकी तीव्र असते की, व्यक्ती काही वेळासाठी काहीच करू शकत नाही. अनेकांमध्ये मायग्रेनची समस्या ही आनुवांशिक असते. तसेच ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक बघायला मिळते.

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्य