शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Special : पावसाळ्यात फिट राहण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 12:53 IST

पावसात मजा करण्याच्या उत्साहात आपण काही गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे आजारी पडणे आलेच.

पावसाला तशी जरा उशीराच सुरुवात झाली. आता सगळीकडेच जोरदार पाऊस बरसतो आहे. पाऊस सर्वांनाच आवडतो. पण पाऊस एन्जॉय करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. पावसात मजा करण्याच्या उत्साहात आपण काही गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे आजारी पडणे आलेच. पण हे आजारी पडणे तुम्ही रोखू शकता त्यासाठी काही खास टिप्स खालीलप्रमाणे....

जेवणाआधी हात स्वच्छ धुवा

जास्तीत जास्त हेल्थ प्रॉब्लेम हे हातांव्दारे पोटात गेलेल्या किटाणूंमुळे होते. त्यामुळे काहीही खाण्याआधी एकदा हात नक्की धुवा. तुमची नखं वाढली असतील तर ती कमी करावीत. कारण नखांमध्ये लपलेले किटाणू तुम्हाला आजारी करु शकतात. 

काय खावे?

1) कडू आणि चटपटीत पदार्थांचे सेवन करा. 2) भात, ताक, दही, कारलं, आलं आणि कच्चा कांदा खावू शकता. 3) पावसाळ्यात गॅस, अपचन अशा समस्या अधिक होतात. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 चा समावेश करा. 4) लिंबू, आलुबुखारा, संत्री, आवळा, पेरु यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले फळे खावे. यामुळे स्कीनच्या समस्या दूर होतात. 

हे पदार्थ खाऊ नये

1) पालेभाज्या पावसाळ्यात अजिबात खाऊ नये. कारण पावसाळ्यात भाज्यांवर मोठ्या प्रमाणात किटाणू असतात. पावसाळ्यात पालेभाज्या डायजेस्ट होत नाहीत. 2) स्ट्रीट फूड आणि फास्ट फूड खाऊ नका.3) आधीच कापून ठेवलेली फळे खाऊ नका. 4) जास्त मिठ असलेले किंवा आबंट पदार्थ खाऊ नका.5) खूप जास्त तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाऊ नका. 

भीजलेले कपडे परिधान करु नका

जर तुम्ही पावसात भीजले असला तर शक्य असल्यास लगेच कपडे बदला. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका. खासकरुन भीजलेले अंडरगारमेंट्स वापरल्यास फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासोबतच भीजलेले शूज आणि सॉक्सही वापरू नका.

घराची स्वच्छता

घरात किंवा घराजवळ पाणी साचल्यास त्यात डास आणि इतर किटाणू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पाणी साचू देऊ नका. घरातील लादी वेळोवेळी स्वच्छ करा. चपला-जोडे घरात आत नेऊ नका.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल