शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

कोरोना काळात ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी गुड न्युज! रोगप्रतिकारकशक्ती कमालीची वाढते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 17:54 IST

ध्यानादरम्यान, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य गतिमान होते आणि त्यात दाहक सिग्नल सक्रिय होत नाहीत. अशा प्रकारे, ध्यान कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली बरे करण्यास मदत करते.

अलीकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या जीनोमिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सखोल ध्यान म्हणजेच अ‍ॅडवांस्ड मेडिटेशन रोगप्रतिकारक प्रणालीच्या क्रियाकलापांशी संबंधित आहे. यूएसएच्या ओरेगॉन युनिव्हर्सिटीच्या (University of Oregon) शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासात, अ‍ॅडवांस्ड मेडिटेशनशी संबंधित ट्रान्सक्रिप्शनल प्रोग्रामची (transcriptional program) ओळख आणि स्वरूप याबद्दल माहिती गोळा केली गेली आहे. यासोबतच बायोइन्फर्मेटिक्सच्या माध्यमातून ध्यानाशी संबंधित विविध नेटवर्क्स एकत्रित करण्यात आल्या. हे कोर नेटवर्क विविध रोगप्रतिकारक सिग्नलच्या मार्गांद्वारे जोडलेले आहेत.

योग आणि ध्यानाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणामांबद्दल (Physical And Mental Health) पूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये सांगितला गेले आहे. परंतु, त्यात असलेली आण्विक यंत्रणा आणि महत्त्वाच्या जनुकांचे योगदान अद्याप व्यापकपणे समजलेले नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (Proceedings of the National Academy of Sciences), यूएसएच्या पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. (Deep meditation is helpful for immune system)

संशोधन कसे झाले?संशोधकांनी सांगितले की, ही कोर ट्रान्सक्रिप्शनल प्रोफाइल (core transcriptional profile) मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजेच मेंदू आणि स्पाइनल कॉर्डशी संबंधित रोग आणि कोविड-19 संसर्गादरम्यान निष्क्रिय होते. या अभ्यासासाठी, सुमारे ४० वर्षे वयोगटातील १०६ स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांचे जीनोमिक आणि जैव सूचनात्मक विश्लेषण करण्यात आले. ते सर्व सखोल परित्याग ध्यान (मेडिटेशन) च्या अमलात होते. ज्यामध्ये त्यांनी ८ दिवस दिवसातील १० तासांपेक्षा जास्त शांततेत घालवले.

विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, ध्यानानंतर प्रतिकारशक्तीशी संबंधित २२० जीन्सच्या अभिव्यक्तीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये इंटरफेरॉन सिग्नलिंगशी संबंधित ६८ जनुकांचा समावेश आहे, परंतु दाहक जनुकांच्या अभिव्यक्तीमध्ये कोणताही बदल झाला नाही. संशोधकांना त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षात असेही आढळून आले की ध्यानादरम्यान, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य गतिमान होते आणि त्यात दाहक सिग्नल सक्रिय होत नाहीत. अशा प्रकारे, ध्यान कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली बरे करण्यास मदत करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स