शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाचा सन्मान सोहळा रंगतो तेव्हा...

By संतोष आंधळे | Updated: November 4, 2024 13:09 IST

Medical Education: मृतदेहाचे आभार मानण्याचा सोहळा, ऐकायला थोडे अवघड वाटेल. पण, हेच सत्य आहे. होय मृतदेहाचा सन्मान सोहळा देशातील काही निवडक वैद्यकीय  महाविद्यालयांत आयोजित केला जातो.

मृतदेहाचे आभार मानण्याचा सोहळा, ऐकायला थोडे अवघड वाटेल. पण, हेच सत्य आहे. होय मृतदेहाचा सन्मान सोहळा देशातील काही निवडक वैद्यकीय  महाविद्यालयांत आयोजित केला जातो. यावेळी एमबीबीएस अभ्यासक्रमाचे दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी, पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर हा सोहळा आयोजित करतात. याठिकाणी दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी त्यांचा शरीरशास्त्र विषयात त्यांना मृतदेह विच्छेदनातून आलेले अनुभव त्यांच्यासमोर विशद करून त्यांच्या आयुष्यात मृतदेहाचे किती महत्त्व आहे, याची सविस्तर माहिती देतात. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात दोन-तीन विद्यार्थी भाषण करून मृतदेह (कॅडेव्हर) हा विद्यार्थ्यांसाठी प्रथम वैद्यकीय शिक्षक म्हणून असल्याचे सांगतात.

अलीकडेच जे. जे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शवविच्छेदन करताना आलेल्या अनुभवाची आणि त्याद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची माहिती प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाला (कॅडेव्हर थॅंक्स गिव्हिंग सेरेमनी), असे म्हणतात. हा कार्यक्रम नवीन विद्यार्थ्यांच्या ‘व्हाइट कोट’ सोहळ्यादरम्यान आयोजित केला गेला होता. 

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शरीरशास्त्र हा विषय शिकविला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शवविच्छेदन करून शरीराच्या रचनेची माहिती दिली जाते. या मृतदेहांच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरात प्रत्येक अवयवाची मुळापासून माहिती होते. या व्यतिरिक्त देशातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांत पहिल्या वर्षी शरीररचनाशास्त्र विभागात कॅडेव्हरिक शपथ (ज्याला शवथपथ असेही संबोले जाते) घेतात. ही शपथ एक प्रतिज्ञा आहे, जी विद्यार्थी ज्या मानवी अवशेषांवर ते काम करणार आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यासाठी करतात. शवविच्छेदनापूर्वी शपथ घेणे ही  एक पद्धत आहे. ज्याद्वारे प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना नैतिकतेच्या मूलभूत घटकांची ओळख करून दिली जाते. या शपथेत त्यांना, तुम्ही माझे पहिले शरीरशास्त्र शिक्षक आहात. या ज्ञानाचा उपयोग मी समाजसेवेसाठी करेन. ज्या उद्देशाने आपले शरीर दान करण्याचे धाडसी कृत्य आमच्या शिक्षणासाठी केले आहे या कृत्याबद्दल मी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा ऋणी राहीन. या आशयाची शपथ विद्यार्थी घेत असतात.

त्यामुळेच वैद्यकीय विद्यार्थी त्या मृत आत्म्याला पूर्ण आदराने कृतज्ञता व्यक्त करतात. शरीरशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत मृतदेह आणून सर्व विद्यार्थी आदराने नतमस्तक होतात. त्यानंतरच त्याचा उपयोग शिक्षणासाठी केला जातो. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांसाठी किमान एक मृतदेह उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्या वीस विद्यार्थ्यांची एक बॅच वर्षभर त्या एका मृतदेहावर शिकत असते. टेबलच्या एका बाजूला  दहा आणि दुसऱ्या बाजूला दहा विद्यार्थी यावर शिकत असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी त्या मृतदेहाचे आभार मानून आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करत असतात, जी त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायासाठी जीवनभर पुरणारी शिदोरी ठरते. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल