शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:36 IST

आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंब्याची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक अनेक कारणांनी आंबे खाणे टाळतात. मात्र हा आंबा कुणी खावा कोणी खाऊ नये, हे आज आपण पाहणार आहोत.

आंबा म्हणजे फळांचा राजा. अनेकजण फक्त आंब्याची चव चाखता यावी म्हणून उन्हाळ्याची वाट बघतात.  आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायेदशीर आहे. आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंब्याची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक अनेक कारणांनी आंबे खाणे टाळतात. मात्र हा आंबा कुणी खावा कोणी खाऊ नये, हे आज आपण पाहणार आहोत.

आंब्याने वजन वाढते का?आंबा सोडियम आणि कोलेस्ट्रॉलमुक्त असतो. त्यामुळे आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही. आंब्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, बी ६, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे फळ बिनधास्त खा.

आंबा त्वचेसाठी फायदेशीर आंब्यात अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे कार्य करतात. तसेच आंबा त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

मधुमेहाचे रूग्ण आंबा खाऊ शकतात का?आंबा हे एक गोड फळ आहे. मात्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे चांगले आहे. म्हणून मधुमेह असलेले लोक दिवसातून एक आंबा खाऊ शकतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आंब्याचे फायदे1. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.2. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.3. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.4. फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नfruitsफळे